तरुणांचा वाढता स्कीन टाईम धोक्याची घंटा!

गॅजेटच्या अतिवापरामुळे पाठ, मणक्याच्या समस्यांत ६० टक्के वाढ; डॉक्टरांची माहिती
Smartphone and Health
तरुणांमध्ये गॅजेट्सचा अतिवापर धोकादायक ठरत असून अनेकांना पाठ आणि मानेच्या दुखण्याचा त्रास होत आहे. (file photo)
Published on
Updated on

मुंबई : तरुणांमध्ये गॅजेट्सचा अतिवापर धोकादायक ठरत असून अनेकांना पाठ आणि मानेच्या दुखण्याचा त्रास होत आहे. गॅजेटच्या अतिवापरामुळे पाठीच्या आणि मणक्याच्या समस्येत ६० टक्के वाढ झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मणक्याला सुरक्षित ठेवण्यासाठी गॅजेटचा वापर कमी करणे, स्क्रीन टाईम कमी करण्यासह दैनंदिन जीवनात व्यायाम, स्ट्रेचिंग करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, २० ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांना पाठ किंवा मानेच्या दुखण्याने घेरले आहे. अनेक जण आपला स्मार्टफोन पाहत असताना कित्येक तास कुबड काढून मोबाईल स्क्रीनजवळ घेऊन बसतात. अशा व्यक्तींना डोकेदुखी, मानदुखी, हातदुखी आणि बधिरपणा असे त्रास होऊ शकतात. नेहमीच्या उभे राहण्याच्या पद्धतीमध्ये मान आणि पाठ सरळ राहात असते; पण जेव्हा आपण मान खाली करून खूप वेळ पाहत राहतो तेव्हा मान, पाठ आणि कणा या सगळ्यांवरच त्याचा ताण येतो..

लिलावती रुग्णालयातील स्पाईन सर्जन डॉ. राम चड्डा म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अतिवापरामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शारीरिक ठेवण बिघडते आणि पाठीचा कणा तसेच मणक्यावर अतिरिक्त ताण येतो. या गॅजेट्सचे जितके जास्त व्यसन जडते, तितका जास्त मणक्यावर दुष्परिणाम होतो. ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन डॉ. मोहित मुथा म्हणाले की, काही वेळा मूत्र किंवा आतड्यांवरील नियंत्रण कमी होणे, मुंग्या येणे किंवा हात व हाताची बोटे, पाय आणि पायाची बोटे यांमधील संवेदना कमी होणे अशा तक्रारी सतावतात.

Smartphone and Health
Hemant Soren | झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आणखी एक धक्का, याचिकेवरील सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १० पैकी ७ रुग्णांना पाठ आणि मानदुखीची समस्या आढळून येत आहेत. मेडिकवर रुग्णालयातील स्पाइन सर्जन डॉ. बुरहान सलीम सियामवाला यांनी सांगितले की, मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर ज्यामध्ये पाठीच्या आणि मानेच्या समस्यांचा समावेश होतो, ते तुमचे स्नायू, नसा, स्नायुबंध, सांधे आणि पाठीच्या डिस्कवर परिणाम करतात. यामुळे थकवा येणे, ऊर्जेचा अभाव आणि शारीरिक सक्रियता कमी होते.

अतिवापरामुळे उद्भवतो 'हा' त्रास

  • वाढत्या स्क्रीन टाईममुळे पाठीच्या आणि मणक्याच्या समस्या उद्भवतात.

  • स्क्रीनसमोर बराच वेळ घालवल्यामुळे मान अखडणे, खांद्याच्या चकत्यांमध्ये वेदना होणे, अंगदुखी किंवा डोकेदुखी यांसारख्या समस्या जाणवत आहेत.

  • प्रवासात मोबाईल फोन वापरणे किंवा काम करताना

  • ब्रेक न घेता तासनतास लॅपटॉप वापरणे.

  • बसण्याची चुकीची पद्धत, दीर्घकाळ एकाच जागेवर बसणे.

  • जेव्हा आपण मान खाली करून खूप वेळ स्क्रीन पाहत राहतो तेव्हा मान, पाठ आणि कणा या सगळ्यांवरच त्याचा ताण येतो.

काय काळजी घ्यावी

  • मणका लवचिक आणि मजबूत ठेवण्यासाठी वेट ट्रेनिंग प्रशिक्षण, योग, मेडिटेशन, स्ट्रेचिंग आणि कार्डिओ यांचा समावेश करावा.

  • दीर्घ कालावधीसाठी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापक टाळावा.

  • बसताना कुबड काढून किंवा पुढे झुकन बसणे टाळा.

  • मणक्यासंबंधित समस्यांना दूर करण्यासाठी योग्य शारीरिक ठेवण असणे गरजेचे आहे.

  • चांगल्या दर्जाची खुर्ची वापरा. • कामादरम्यान लहान लहान ब्रेक घेणे आणि स्ट्रेचिंग करणे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news