पश्चिम बंगालमध्ये सौरव गांगुलीच्या गाडीचा अपघात; कोणतीही शारीरिक हानी नाही

माजी क्रिकेटपटू थोडक्यात बचावले
Sourav Ganguli
सौरव गांगुलींच्या कारला अपघातPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुर्गापूर एक्सप्रेसवेवर गुरुवारी (दि.20) माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या कारचा अपघात झाला. सौरव गांगुली एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बर्दवानला जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दंतनपूरजवळ अचानक त्यांच्या ताफ्यासमोर एक ट्रक आला, ज्यामुळे त्यांच्या चालकाला अचानक ब्रेक लावावे लागले. यामुळे मागून येणारी वाहने एकमेकांवर आदळली आणि त्यापैकी एक गाडी सौरव गांगुलीच्या गाडीला धडकली.

या अपघातात सौरव गांगुली किंवा त्याच्या ताफ्यातील इतर कोणीही जखमी झाले नाही. पण गांगुलीच्या ताफ्यातील दोन वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर सौरव गांगुलीला सुमारे १० मिनिटे रस्त्यावर वाट पाहावी लागली, त्यानंतर ते कार्यक्रमासाठी निघून गेले आणि बर्दवान विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले.

Sourav Ganguli
सौरव गांगुली हाेणार डाॅक्‍टरांच्‍या आंदाेलनात सहभागी!

सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष आहेत. तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक आणि प्रभावशाली कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात चमकदार कामगिरी केली आणि अनेक ऐतिहासिक विजयांची नोंद केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news