Sanjay Manjrekar : मांजरेकरांची जीभ पुन्‍हा घसरली! आता दिनेश कार्तिकबद्दल काय बाेलून बसले?

लाइव्ह ऑडिओमधील तांत्रिक चुकीमुळे अपमानास्‍पद टिप्पणी चव्‍हाट्यावर
Sanjay Manjrekar's Controversial Comment on Dinesh Karthik
संजय मांजरेकर, दिनेश कार्तिक.File Photo
Published on
Updated on

माणसं तुमच्‍या तोंडावर गोड बोलतात;पण पाठीमागून बाेलताना त्‍यांचे मत तुमच्‍याबद्दल फारसे चांगले असतेच असे नाही. सर्वसामान्‍यांच्‍या बाबतीत हा अनुभव तसा नेहमीच. मात्र आता हा अनुभव टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) घेतला आहे. कारण हॉटस्टार मॅच सेंटर लाइव्ह ऑडिओमधील तांत्रिक चुकीमुळे टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यांनी दिनेश कार्तिकबद्दल केलेली अपमानास्पद टिप्पणी चव्‍हाट्यावर आली आहे. मांजरेकरांनी यापूर्वी रवींद्र जडेजा, इरफान पठाण, मोहम्‍मद शमी यांच्‍याबद्दल वादग्रस्‍त विधाने केली हाेती. आता या यादीत दिनेश कार्तिक या नावाची भर पडली आहे. मात्र त्‍यांनी केलेल्‍या अपमानास्‍पद टिप्पणींवर साेशल मीडियात तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

मांजेरकर नेमकं काय बोलून बसले?

हॉटस्टार मॅच सेंटर लाइव्ह टीमच्या ऑडिओमधील तांत्रिक चुकीमुळे टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकबद्दल केलेली अपमानास्पद टिप्पणी चव्‍हाट्यावर आली आहे. समालोचक संजय मांजरेकर यांनी दिनेश कार्तिकबद्दल अत्यंत अनादराने उल्लेख केला. दिनेश कार्तिकची पत्नी टेनिसपटू असल्यामुळे तो सामना पाहत असेल, असा अंदाज बांधत मांजरेकर म्हणाले, "ये **** देखता होगा". त्यानंतर त्यांनी, "त्याची पत्नी टेनिसपटू आहे का?" अशी विचारणाही त्‍यांनी केली आहे.

image-fallback
बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनेलमधून संजय मांजरेकर ‘आऊट’

 संजय मांजरेकरांवर टीकेची झोड

मांजरेकर्‍यांनी केलेली अपमानास्पद टिप्पणी कॅमेऱ्यात कैद झाला असून, रेडिट सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्मवर व्‍हायरल होताच त्‍यांच्‍यावर टीका होत आहे. एका युजरने म्‍हटलं आहे की, संजय मांजरेकरचे वडील एक उत्तम क्रिकेटपटू होते. त्‍यामुळे तो येथे आहे. त्‍याने केलेले भाष्‍य सर्वांना आवडत नाही. तर दुसर्‍या युजरने म्‍हटलं आहे की, कोणीतरी कृपया हे X वर पोस्ट करा. गोष्टी व्हायरल होऊ शकतात जेणेकरून भारतीय क्रिकेट आणि जागतिक क्रिकेटच्या एका मोठ्या दिग्गजाबद्दल वाईट बोलल्याबद्दल संबंधितांवर टीका होईल. त्याच्याकडून सी ग्रेड वर्तनामुळे तो मूर्खासारखा वागेल अशी अपेक्षा नव्हती, मांजरेकर निश्चितच याबद्दल माफी मागतील, अशी अपेक्षा एका युजरने व्‍यक्‍त केली आहे. यापूर्वी संजय मांजरेकरांनी रवींद्र जडेजा, इरफान पठाण, मोहम्‍मद शमी आणि आता दिनेश कार्तिकवर अपमानास्पद टिप्पणी केली आहे. तरीही त्‍यांना शांतता लाभलेली नाही. हा क्रिकेटपटू देशात सचिन तेंडुलकरनंतर आपणच असा वागतो, असा टोला एका युजरने लगावला आहे. एकूणच संजय मांजरेकर यांची अपमानास्पद टिप्पणी दिनेश कार्तिकच्‍या चाहत्‍यांसह क्रिकेटप्रेमींना आवडलेली नाही. अनेकांनी या टिप्‍पणीबद्‍दल माजरेकारांनी माफी मागावी, अशी मागणी कार्तिकचे चाहते करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news