

Sachin Tendulkar invite PM Narendra Modi सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जून याचे लग्न ठरले आहे. आज त्याने सर्व कुंटूंबासह दिल्ली येथील उपस्थित राहून लग्नाचे आमंत्रण दिले आहे. यावेळी मोदी यांच्या सोबतच फोटो सचिनने आपल्या एक्स हँडलवरुन पोस्ट केला आहे. तसेच यावेळी अर्जुन व त्याची वाग्दध वधू सानिया यांनीही मोदींसोबत फाटो काढला आहे.
या भेटीवेळी सचिन त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि होणारी सून सानिया चांडोक या सर्वांनी मिळून पंतप्रधानांची भेट घेतली. सचिनने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने लिहिले की, "आम्हाला अर्जुन आणि सानियाच्या लग्नासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आमंत्रित करण्याचे सौभाग्य मिळाले. या तरुण जोडप्याला दिलेल्या आशीर्वादाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मोदीजींचे आभार."
दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या लग्नाची तारीख आता समोर आली असून. अर्जुन आणि त्याची मैत्रीण सानिया चांडोक यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. हे लग्न लग्नाची तारीख: ५ मार्च २०२६ रोजी होणार असून हा विवाह सोहळा मुंबईत पार पडणार आहे.
कोण आहे सानिया चांडोक?
सानिया चांडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि 'ग्रॅव्हिस ग्रुप'चे अध्यक्ष रवी घई यांची नात आहे. तसेच सानिका स्वतः एक यशस्वी उद्योजक असून पेट केअर व्यवसायात सक्रिय आहे. अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा ऑगस्ट २०२५ मध्ये अत्यंत खाजगी स्वरूपात पार पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न अत्यंत खाजगी असेल. यात फक्त जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि क्रिकेट जगतातील काही मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार आहे. अर्जुन तेंडुलकर सध्या क्रिकेटमध्येही आपली ओळख निर्माण करत आहे आणि नुकताच तो आयपीएल २०२६ साठी लखनऊ सुपर जायंट्स संघात सामील झाला आहे.