सचिन तेंडुलकरचा ‘सीके नायडू जीवनगौरव’ पुरस्काराने होणार सन्मान

Sachi Tendulkar : शनिवारी पुरस्कार प्रदान केला जाणार
Sachi Tendulkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sachi Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला बीसीसीआयकडून सन्मानित केले जाणार आहे. मंडळातर्फे मास्टर-ब्लास्टरला सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळवणारा सचिन हा 31 वा क्रिकेटपटू ठरणार आहे. शनिवारी मुंबईत होणाऱ्या मंडळाच्या वार्षिक समारंभात सचिनला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला याबाबत माहिती दिली.

भारतासाठी 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या 51 वर्षीय सचिनच्या नावावर क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने सर्वाधिक 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 15,921 आणि 18,426 धावा कुटल्या आहेत. सचिनने आपल्या शानदार कारकिर्दीत फक्त एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

तेंडुलकरला पुरस्कार का?

आपल्या काळातील महान फलंदाज मानला जाणारा तेंडुलकर प्रत्येक परिस्थितीत सहज धावा काढण्यासाठी ओळखला जात असे. त्याने वयाच्या 16 व्या वर्षी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पुढील 24 वर्षांत त्याने जगभरातील गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या. कसोटी आणि एकदिवसीय मिळून 100 शतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तेंडुलकर भारताच्या 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख सदस्य होता. हा त्याचा विक्रमी सहावा आणि शेवटचा विश्वचषक ठरला.

1983 मध्ये, भारताच्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य रवी शास्त्री आणि फारूक इंजिनियर यांना कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. फारुख यांनी भारतासाठी 46 कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळले.

31 वर्षांपूर्वी पुरस्काराची सुरुवात

BCCI ने हा पुरस्कार 1994 मध्ये भारताचे पहिले कर्णधार कर्नल सीके नायडू यांच्या सन्मानार्थ सुरू केला होता. नायडू यांची 1916 ते 1963 दरम्यान 47 वर्षांची प्रथम श्रेणी कारकीर्द राहिली. हा एक जागतिक विक्रम आहे. नायडू यांनी प्रशासक म्हणूनही या खेळाची सेवा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news