Sachin Tendulkar : अर्जुनचा निर्णायक मारा अन् सचिनच्या चेहर्‍यावर स्मितहास्य

Sachin Tendulkar : अर्जुनचा निर्णायक मारा अन् सचिनच्या चेहर्‍यावर स्मितहास्य
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा : सनरायजर्स हैदराबादला शेवटच्या षटकात 20 धावांची आवश्यकता असताना मुंबईकडे शौकिन व अर्जुन तेंडुलकर यांच्यापैकी एकाकडे चेंडू सोपवण्याचा पर्याय उपलब्ध होता. कर्णधार रोहितने हे कठीण षटक अर्जुनकडे सोपवले आणि अर्जुननेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत संघाला 14 धावांनी स्वप्नवत विजय मिळवून दिला. या निर्णायक षटकात अर्जुनने अब्दुल समदला पहिला चेंडू निर्धाव टाकला, तर दुसरा चेंडू डीप पॉईंटकडे फटकावत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात समद धावचीत झाला. अर्जुनचा पुढील चेंडू वाईड गेला; पण त्यानंतर दोन चेंडूंत त्याने केवळ तीन धावा दिल्या. यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमार एक्स्ट्रा कव्हरवर तैनात रोहितकडे सोपा झेल देत बाद झाला व इथेच सनरायजर्सचा डाव 19.5 षटकांत 178 धावांमध्ये गुंडाळला गेला. अर्जुनने संघाला असा स्वप्नवत विजय मिळवून दिल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित सचिनच्या चेहर्‍यावर स्मितहास्य झळकले नसते तरच नवल. विजयानंतर रोहित आणि सर्व संघ सहकार्‍यांनी केलेल्या कौतुकाने अर्जुन थोडा लाजल्यासारखा दिसत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news