सचिन तेंडुलकरला बीसीसीआयकडून सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Sachin Tendulkar | आयसीसीचे चेअरमन जय शाह यांच्या हस्‍ते झाला गौरव
Sachin Tendulkar
आयसीसीचे चेअरमन जय शाह यांच्याहस्‍ते मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर याचा सन्मान करण्यात आलाImage Source X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मास्‍टर ब्‍लास्‍टर म्‍हणून जगभरात ख्याती असलेला सचिन तेंडुलकर याचा आज बीसीसीआयतपर्फे सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्‍काराने गौरव करण्यात आला. मुंबई येथे झालेल्‍या या सोहळयात आयसीसीचे चेअरमन जय शाह यांच्या हस्‍ते सचिनला सन्मानित करण्यात आले. आज शनिवारी १ फेब्रुवारी रोजी बीसीसीआयच्या वार्षिक ‘नमन ॲवार्ड’ सोहळयात हा सत्‍कार करण्यात आला.

Sachin Tendulkar ‘क्रिकेटचा देव’ अशी उपाधी मिळवलेल्‍या सचिन तेंडुलकरने वयाच्या १६ व्या वर्षी आंतराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केले होते. १५ नोव्हेंबर १९८९ रोजी टेस्‍टमध्ये त्‍याचे पदापर्ण झाले तर त्‍याच वर्षी महिन्याच्या अंतराने १८ डिसेंबरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदापर्ण झाले.

आपल्‍या अफलातून बॅटिंगच्या कौशल्‍याने तिन दशके क्रिकेटप्रेमींच्या मनावर सचिनने राज केले. अनेक विक्रमांना गवसणी घालून क्रिकेटमधील आख्यायिका रचण्याचे काम त्‍याने केले आहे. सचिन तेंडूलकर याच्यामुळे भारतीय संघाला अनेक क्रिकेट स्‍पर्धांच्या जेतेपदांना गवसणी घालता आली. त्‍यामुळे खऱ्या अर्थाने ‘क्रिकेटचा देव’ हे बिरुद त्‍याने सार्थकी लावले आहे. टेस्‍ट पासून आताच्या वेगवान टी- २० या क्रिकेटच्या बदलत्‍या स्‍वरुपात त्‍याची बॅट तळपली आहे.

परत एकदा सचिन उतरणार मैदानात

Sachin Tendulkar आता २२ फेब्रूवारी २०२५ रोजी इंटरनॅशन मास्‍टर लीग या मुंबईमध्ये होणाऱ्या स्‍पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. यामध्ये भारताचे नेतृत्‍व सचिन तेंडुलकर करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेच्या टिमची धुरा कुमार संघकारा सांभाळणार आहे. ‘माझ्या समकालीन खेळाडूंच्या बरोबर खेळण्यास मिळणार याची मला उत्‍सूकता आहे. या सामन्यामध्ये स्‍पर्धेची इर्षा असणार आहे पण ती निःपक्ष पणे असणार आहे’ अशी या सामन्याविषयी सचिनने प्रतिक्रीया दिली आहे

भारतासाठी 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या 51 वर्षीय सचिनच्या नावावर क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने सर्वाधिक 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 15,921 आणि 18,426 धावा कुटल्या आहेत. सचिनने आपल्या शानदार कारकिर्दीत फक्त एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. कसोटी आणि एकदिवसीय मिळून 100 शतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

Sachin Tendulkar
सचिन तेंडुलकरचा ‘सीके नायडू जीवनगौरव’ पुरस्काराने होणार सन्मान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news