t20 cricket world cup| द. आफ्रिका-न्यूझीलंड सामन्‍यात पावसाचा 'खेळ' झाल्यास फायनलमध्ये कोण धडक मारणार?

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर आज रंगणार टी-२० विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना

T20 World Cup 2026 SA vs NZ Semi Final
प्रतीकात्मक छायाचित्र.
Published on
Updated on

T20 World Cup 2026 SA vs NZ Semi Final

कोलकाता: टी-२० विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना (सेमीफायनल) आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी अत्यंत चमकदार राहिली असून, अजेय राहत त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघानेही दमदार खेळ दाखवत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

दक्षिण आफ्रिका पाचव्‍यांदा उपांत्य फेरीत

दक्षिण आफ्रिका संघाने पाचव्यांदा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. फलंदाजीमध्ये एडन मार्करम जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्याने ७ सामन्यांत १७५ च्या स्ट्राईक रेटने २६८ धावा केल्‍या आहेत. रायन रिकेल्टन (२२८ धावा) आणि क्विंटन डी कॉक (१७१ धावा) यांनीही संघाला भक्कम सुरुवात करून दिली आहे. गोलंदाजीमध्ये लुंगी एनगिडीने १२, कॉर्बिन बॉशने ११ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणले आहे, तर केशव महाराजची फिरकीही प्रभावी ठरत आहे.


T20 World Cup 2026 SA vs NZ Semi Final
T20 World Cup 2026: बाबरला संघात का घेतलं... पाकिस्तानच्या अलीम दार यांचा तडकाफडकी राजीनामा

न्यूझीलंडला स्‍पर्धेत करावा लागला चढ-उतारांचा सामना

न्यूझीलंडला सुपर-८ फेरीमध्ये चढ-उतारांचा सामना करावा लागला. पाकिस्तानविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर इंग्लंडकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. न्‍यूझीलंडच्‍या टिम सीफर्टने ६ सामन्यांत सर्वाधिक २१६ धावा केल्या आहेत. तसेच रचिन रवींद्रने फलंदाजी (११५ धावा) आणि गोलंदाजी (९ विकेट्स) अशा दोन्ही आघाड्यांवर अष्टपैलू कामगिरी केली आहे.


T20 World Cup 2026 SA vs NZ Semi Final
IND vs ENG Semi-Final: वानखेडेवर वादळ! इंग्लंडचे 5 दिग्गज खेळाडू भारतासाठी ठरणार घातक; वर्ल्ड कपचं स्वप्न भंगणार?

ईडन गार्डन्सवर धावांचा पाऊस?

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. येथे चेंडूला चांगला बाऊन्स मिळत असल्याने तो बॅटवर व्यवस्थित येतो, परिणामी चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळू शकते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६२, तर दुसऱ्या डावातील सरासरी १४३ इतकी आहे.


T20 World Cup 2026 SA vs NZ Semi Final
Sunil Gavaskar |सूर्यकुमार-अभिषेक नव्‍हे, सेमी फायनलमध्ये 'हे' दोन खेळाडू ठरणार गेमचेंजर; सुनील गावस्करांनी वर्तवलं भाकीत!

पावसाचे सावट असल्यास 'रिझर्व्ह डे'ची तरतूद

आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी 'रिझर्व्ह डे' (राखीव दिवस) ठेवला आहे. निर्धारित दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त ९० मिनिटांचा वेळ दिला जाईल. जर पावसाने व्यत्यय आणला, तर सामना थांबलेल्या ठिकाणाहून दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ मार्च रोजी सुरू होईल.


T20 World Cup 2026 SA vs NZ Semi Final
Sunil Gavaskar : सॅमसनच्या खेळीने गावस्कर भारावले; म्हणाले, ‘प्रत्येकाला तो यशस्वी व्हावा असेच वाटते’

सामना रद्द झाला तर फायनलमध्ये कोण?

  • जर राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर सुपर-८ फेरीतील कामगिरीच्या आधारावर निकाल लावला जाईल.

  • दक्षिण आफ्रिका: सुपर-८ मध्ये ३ सामने खेळून तिन्ही जिंकले (६ गुण).

  • न्यूझीलंड: ३ सामन्यांत १ विजय, १ पराभव आणि १ सामना रद्द (३ गुण).

  • अशा परिस्थितीत, सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत वरच्या स्थानी असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.


T20 World Cup 2026 SA vs NZ Semi Final
Sunil Gavaskar | ICC 'सुपर 8' ग्रुपवर टीका करणार्‍यांना सुनील गावस्‍करांनी सुनावले, "जे लोक आता..."

हवामानाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी कोलकात्यात पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. दिवसभर कडक ऊन राहण्याचा अंदाज असून कमाल तापमान ३३°C आणि किमान २०°C राहील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news