Cristiano Ronaldo| विक्रमवीर रोनाल्डो; '900' गोल करणारा पहिला फुटबॉलपटू

रोनाल्डोच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, '900' गोल करणारा पहिला फुटबॉलपटू
Cristiano Ronaldo
रोनाल्डोने फुटबॉल कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वामध्ये आपल्या दमदार खेळाच्या जोरावर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो (Cristiano Ronaldo) चाहत्यांच्या ह्रदयावर कित्येक वर्षांपासून अधिराज्य गाजवत आहे. यासोबत रोनाल्डोने फुटबॉल कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यामध्ये काल झालेल्या सामन्यात त्याने आणखी एका विक्रमाची भर घातली आहे.

गुरूवारी लिस्बन येथे झालेल्या UEFA नेशन्स लीग स्पर्धेत क्रोएशियाविरूद्ध पोर्तुगाल असा सामना झाला. या सामन्यात 34 वा मिनिटाला नुनो मेंडिसच्या क्रॉसवर संघाचा दुसरा गोल वैयक्तिक पहिला गोल करत रोनाल्डोने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. यासह रोनाल्डो फुटबॉल इतिहासात 900 गोल डागणारा तो पहिला फुटबॉलपटू बनला आहे. हा सामना पोर्तुगालने 2-1 ने जिंकला. हा सामना जिंकताच रोनाल्डो भावूक झाला.

रोनाल्डोने नोंदवलेले 900 गोल

या गोलसह 39 वर्षीय रोनाल्डोने आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 131 गोल केले आहेत. क्लब कारकिर्दीत रोनाल्डोने रिअल माद्रिदसाठी 450, मँचेस्टर युनायटेडसाठी 145, जुव्हेंटससाठी 101 आणि अल नासरसाठी 68 गोल केले आहेत. तर, त्याने स्पोर्टिंग लिस्बन या क्लबसाठी 5 गोल केले आहेत.

सर्वाधिक गोलच्या यादीत मेस्सी 'या' क्रमांकावर

सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत अर्जेंटिनाचा दिग्गज आणि विश्वचषक विजेता लिओनेल मेस्सी रोनाल्डोनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 842 गोल केले असून तो रोनाल्डोपेक्षा 58 गोलने मागे आहे. तर ब्राझीलचा महान खेळाडू पेले 765 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

Cristiano Ronaldo
मुशीर खानचे पदार्पणाच्या सामन्यात शतक, भारत-बी संघासाठी बनला संकटमोचक

कारकिर्दीतील मैलाचा दगड

या ऐतिहासिक कामगिरीनंतर रोनाल्डो म्हणाला, हा एक मैलाचा दगड होता, जो मला खूप दिवसांपासून गाठायचा होता. मला माहित होते की मी या क्रमांकावर पोहोचेन कारण मी खेळत राहिलो, हे नैसर्गिकरित्या घडेल. पुढे तो म्हणाला, "हा क्षण भावनिक आहे. हा एक मैलाचा दगड आहे. परंतु, मला आणि माझ्या सभोवतालच्या लोकांना माहित आहे की, दररोज काम करणे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे हे किती कठीण आहे. 900 गोल करणे खूप कठीण आहे. माझ्या कामगिरीतील सातत्याने हा मैलाचा दगड गाठणे शक्य झाले.

Cristiano Ronaldo
पॅरालिम्पिक : भारताच्या खात्यात 25 वे पदक! कपिल परमारने ज्युदोमध्ये जिंकले कांस्यपदक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news