Rohit Sharma World Record : हिटमॅन 50 टी-20 जिंकणारा जगातील पहिला कर्णधार!

रोहित शर्मा अव्वल.. भारतासाठी केल्या सर्वाधिक धावा
Rohit Sharma World Record
भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर राहिला.Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 ची समाप्ती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्याने झाली. या सामन्यात भारताने प्रोटीज संघाचा 7 धावांनी पराभव करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वविजेते होण्याचा मान मिळविला. या मोसमात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर राहिला. त्याने कर्णधार म्हणूनही चमकदार कामगिरी केली. त्याने या मोसमात 250 धावांचा आकडा पार केला, तर सूर्यकुमार यादव या यादीत दुसऱ्या स्थानावर तर ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर राहिला.

रोहितच्या सर्वाधिक धावा

यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माने 8 सामन्यांच्या 8 डावात 36.71 च्या सरासरीने आणि 156.70 च्या स्ट्राईक रेटने एकूण 257 धावा केल्या. त्याने 3 अर्धशतके झळकावली या दरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 92 होती. या काळात त्याने 24 चौकार आणि 15 षटकारही मारले. सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर राहिला.

सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी

भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने 8 सामन्यांच्या 8 डावात 28.42 च्या सरासरीने 199 धावा केल्या. यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 53 राहिली. त्याने आपल्या बॅटमधून 15 चौकार आणि 10 षटकार ठोकले. या यादीत ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 8 सामन्यात 127.61 च्या सरासरीने 171 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 42 धावा राहिली. या काळात त्याने 19 चौकार आणि 6 षटकारही मारले.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा

319 : विराट कोहली (2014)

296 : विराट कोहली (2022)

273 : विराट कोहली (2016)

257 : रोहित शर्मा (2024)

239 : सूर्यकुमार (2022)

227 : गौतम गंभीर (2007)

219 : सुरेश रैना (2010)

200 : रोहित शर्मा (2021)

कर्णधार म्हणून रोहितने जिंकले 50 टी-20 सामने

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि 50 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा तो जगातील पहिला कर्णधार बनला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 48 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय

50 : रोहित शर्मा (भारत)

48 : बाबर आझम (पाकिस्तान)

45 : ब्रायन मसाबा (युगांडा)

44 : इऑन मॉर्गन (इंग्लंड)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news