

Rohit Sharma New Tesla Elon Musk post :
रोहित शर्मा अन् लॅम्बॉर्गिनी उरूस या गाडीचं एक विशेष कनेक्शन होतं. मुंबईच्या रस्त्यावरून निळ्या रंगाची लॅम्बॉर्गिनी उरूस गेली की गाडीत रोहित शर्मा तर नाही ना अशी चर्चा चाहत्यांमध्ये होत होती. नुकतेच रोहित शर्मानं त्याची उरूस ही आपल्या चाहत्याला भेट म्हणून दिली. त्यानंतर आता भारताच्या माजी कर्णधाराच्या ताफ्यात नवी कोणती गाडी दाखल होणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. रोहितनं नवी टेस्ला मॉडेल वाय गाडी घेतली आहे. त्याच्या या नव्या गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रोहितचा हा व्हिडिओ रिट्विट करण्याचा मोह खुद्द टेस्लाचे मालक एलन मस्क यांना देखील आवरला नाही. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत पोस्ट केली. ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 'म्हणूनच टेस्लाला जाहिरात करण्याची गरज नाही. रोहित शर्मा ज्याचे इन्स्टाग्रामवर ४५ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यानं नुकतेच नवी टेस्लाची मॉडेल वाय घेतली आहे.'
टेस्ला कंपनीने आपले भारतातील पहिले आऊटलेट (शोरूम) मुंबई येथे सुरू केले आहे. हे शोरूम वांद्रे कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex - BKC), मुंबई येथे मेकर मॅक्सिटी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये उघडले आहे. याला 'टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर' असे म्हटले जाते. या शोरूमचे उद्घाटन १५ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
टेस्लाचे हे भारतातील पहिले अधिकृत आऊटलेट असून, तेथे ग्राहक टेस्लाच्या गाड्या पाहू शकतात आणि टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतात. भारतात विक्रीसाठी उपलब्ध झालेले टेस्लाचे पहिले मॉडेल 'Model Y' आहे. या शोरूमवरील फलक मराठी भाषेत असल्याने ही बाब विशेष चर्चेत होती.