

Rohit Sharma Controversy: भारतीय क्रिकेटमध्ये मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. इंग्लंडसोबत सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. इंग्लंड मालिकेपूर्वी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचं प्लॅनिंग सुरू केलं आहे.
रोहित शर्मा हा पुढच्या वर्षीच्या वर्ल्डकपमध्ये चाळीशी पार करणार आहे. त्याचा फॉर्म समाधानकारक आहे. मात्र फॉर्ममध्ये असलेला युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा अनेक दिवसांपासून संधीची वाट पाहत आहे. तो आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गुरूवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्डवरील १९ जुलैचा सामना हा रोहित शर्माचा शेवटचा सामना असणार आहे असं वृत्त आलं आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांची इंग्लंडविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांवर रोहित शर्मा खुश नव्हता.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माला आता आम्ही या वनडे मालिकेनंतर मुव्ह ऑन होणार असल्याचे संकेत दिले. निवडसमिती रोहित शर्माशी बोलली आहे. त्यांच्यासोबत कोच गौतम गंभीर देखील होता. ही चर्चा गेल्या आठवड्यात झाल्याचे वृत्तात म्हटलं आहे.
बीसीसीआय निवडसमिती युवा यशस्वी जैस्वालला संधी देण्याची शक्यता आहे. ते २०२७ च्या वनडे वर्ल्डकपसाठी यशस्वी जैस्वालकडे पाहत आहेत.
बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'निवडसमितीने रोहित शर्माची यापुढे वनडे संघात निवड करणार नाही असा निर्णय घेतला आहे. जर तो सन्मानाने निवृत्त होणार असेल किंवा आताच चो निर्णय घेणार नसेल हा पूर्णपणे त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. निवडसमितीने स्पष्ट संदेश दिला आहे की निवडसमिती त्याला लॉर्ड्सवरील सामन्यानंतर वनडे संघात निवडणार नाहीये.'
७ मे २०२५ रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. समोर इंग्लंड विरूद्धची पाच सामन्यांची मालिका होती. मात्र मालिकेपूर्वी शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं होतं.
रोहित शर्माने २८६ वनडे सामन्यात ११ हजार ७३१ धावा केल्या आहेत. रोहित हा भारताच्या वनडे इतिहासातील एक सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. त्याने ५६ वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केलं होतं. त्याने २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये संघाला फायनलपर्यंत धडक मारून दिली होती.