Rinku Singh Record: ज्या पंक्तीत ब्रॅडमन तिथंही रिंकू सिंहचा दबदबा; पाठोपाठ शतक ठोकत केला मोठा कारनामा

Rinku Singh Record
Rinku Singh Recordpudhari
Published on: 
Updated on: 

Rinku Singh Ranji Trophy Record: रिंकू सिंहने रणजी ट्रॉफीमध्ये धमाका केला आहे. त्याने सलग दोन शतके ठोकली. पहिल्या सामन्यात रिंकूने बिहारविरूद्ध ११२ धावांची खेळी केली तर गोवा विरूद्धच्या सामन्यात त्याने ११८ धावांची केळी केली. त्याच्या या दोन शतकी खेळींचे खूप कौतुक होत आहे.

Rinku Singh Record
Rinku Singh Dropped: फिनिशर रिंकू सिंहची आंतरराष्ट्रीय कारकीर्दच फिनीश..? निवडसमितीने एक चकार शब्दही काढला नाही

डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत

विशेष म्हणजे ज्यावेळी उत्तर प्रदेशची अवस्था ३ बाद ३३ धावा अशी होती. त्यावेळी रिंकूने डाव सावरत संघाला २०० धावांच्या पार पोहचवले. रिंकूने प्रथम श्रेणीमधील दमदार फलंदाजी दमदार सरासरीसह केली आहे. त्याची प्रथम क्षेणीतील सरासरी ६१ वर पोहचली. त्यामुळे तो जगात प्रथम श्रेणीमध्ये सर्वात जास्त सरासरीने धावा करणाऱ्यांच्या टॉप १० च्या यादीत समाविष्ट झाला आहे. या यादीत डॉन ब्रॅडमन यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

Rinku Singh Record
IAS Rinku Singh Rahi Resignation |आयएएस रिंकू सिंह राही यांनी दिला राजीनामा; वडील म्‍हणाले, "त्यानं गोळ्या झेलल्या..."

रिंकूचे रेकॉर्ड

रिंकू सिंहने आतापर्यंत ५५ सामने खेळले असून त्याने ७८ डावांमध्ये ६१.३३ च्या सरासरीने ३९८७ धावा केल्या आहेत. रिंकूने आतापर्यंत ११ शतके ठोकली असून २३ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १७६ धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. तो उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज देखील ठरला आहे.

Rinku Singh Record
Rinku Singh: योगी आदित्यनाथांच्या हस्ते घ्यायचं होतं नोकरीचं नियुक्तीपत्र... रिंकू सिंहने मारली दांडी, कारण की राजकारण?

प्रथम श्रेणीमध्ये सर्वात जास्त सरासरी

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (किमान ५० डाव) सर्वोत्तम सरासरी असलेल्या खेळाडूंच्या यादीत रिंकू सिंह ९ व्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत सर डॉन ब्रॅडमन (३३८ डावात ९५.१४ सरासरी) पहिल्या स्थानावर आहेत. तर त्यानंतर भारताचे विजय मर्चंट (२३४ डाव ७१.६४) हे दुसऱ्या स्थानावर आहेत. याचबरोबर भारताचे अजय शर्मा, शांतनु सुगवेकर आणि सर्फराज खान यांचा देखील टॉप १० मध्ये समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news