Rinku Singh Priya Saroj Engagement | रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोजचा झाला साखरपुडा, पाहा फोटो

Rinku Singh Priya engagement video | भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा लखनऊमध्ये साखरपुडा दिमाखात पार पडला. पाहा या खास सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ...
Rinku Singh-Priya Saroj Engagement
Rinku Singh-Priya Saroj Engagement |file photo
Published on
Updated on

Rinku Singh-Priya Saroj Engagement |

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांनी आज (दि. ८) आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा केला. लखनऊ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला.

Rinku Singh Priya Saroj Engagement
Rinku Singh Priya Saroj Engagement

या समारंभाला सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, खासदार डिंपल यादव, खासदार जया बच्चन, सपाचे नेते शिवपाल सिंह यादव, खासदार राम गोपाल यादव, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी खासदार मोहनलालगंज सुशीला सरोज, माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार, पीयूष चावला तसेच उत्तर प्रदेश रणजी संघाचा कर्णधार आर्यन जुयाल यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.

Rinku Singh Priya Saroj Engagement
Rinku Singh Priya Saroj Engagement

रिंकूने मुंबईतून केली होती अंगठी ऑर्डर

साखरपुड्यासाठी दोघांनीही एकमेकांसाठी खास अंगठ्या ऑर्डर केल्या होत्या. प्रियाने कोलकाता येथून डिझायनर अंगठी खरेदी केली, तर रिंकूने मुंबई येथून खास अंगठी ऑर्डर केली. दोन्ही अंगठ्यांची एकूण किंमत सुमारे २.५ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. समारंभासाठी जेवणाच्या मेन्यूमध्येही त्यांच्या आवडीनुसार पदार्थ ठेवण्यात आले होते. प्रियाच्या आवडीचे बंगाली रसगुल्ले आणि काजू पनीर रोल तर रिंकूच्या आवडीचे पनीर टिक्का आणि मटर मलाई मेन्यूमध्ये होते.

Rinku Singh Priya Saroj Engagement
Rinku Singh Priya Saroj Engagement

प्रिया सरोजचे अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांना खास आमंत्रण

या कार्यक्रमात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. विशेष पासद्वारे फक्त ३०० पाहुण्यांना प्रवेश देण्यात आला होता, ज्यामध्ये बारकोड स्कॅनिंग सिस्टम बसवण्यात आली होती. हॉटेलच्या आत आणि बाहेर खासगी सुरक्षा आणि पोलीस तैनात करण्यात आले होते. व्हीआयपींसाठी एक विशेष सुरक्षा पथक तैनात होते. प्रिया सरोज यांनी या खास कार्यक्रमासाठी सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि खासदार डिंपल यादव यांना आमंत्रित केले होते. याशिवाय समाजवादी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि खासदारांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

Rinku Singh Priya Saroj Engagement
Rinku Singh Priya Saroj Engagement

आयपीएलमध्ये केकेआरकडून २०६ धावा

२७ वर्षीय रिंकू सिंग आयपीएलच्या या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघातून खेळला. त्याची कामगिरी चांगली नव्हती. डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने एकूण ११ डावांमध्ये २९.४२ च्या सरासरीने आणि १५३.७३ च्या स्ट्राईक-रेटने २०६ धावा केल्या. रिंकू सिंग आतापर्यंत भारतासाठी २ एकदिवसीय आणि ३३ टी-२० सामन्यांमध्ये खेळला आहे. यादरम्यान, त्याने २७.५० च्या सरासरीने ५५ एकदिवसीय धावा केल्या आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रिंकूने ४२ च्या सरासरीने ५४६ धावा केल्या आहेत. आता रिंकू ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसू शकतो.

प्रिया सरोज मच्छलीशहरमधून पहिल्यांदाच खासदार

प्रिया सरोज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या तिकिटावर मच्छलीशहरमधून खासदार म्हणून निवडून आल्या. बीपी सरोज यांचा ३५,८५० मतांनी पराभव केला. प्रिया सरोजचा जन्म २३ नोव्हेंबर १९९८ रोजी वाराणसी येथे झाला. प्रियाने तिचे शालेय शिक्षण नवी दिल्लीतील एअर फोर्स गोल्डन ज्युबिली इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केले. यानंतर तिने दिल्ली विद्यापीठातून कला शाखेत पदवी प्राप्त केली. त्यानंतर प्रियाने नोएडातील अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीमधून एलएलबी पदवी प्राप्त केली. प्रियाचे वडील तूफानी सरोज देखील तीनदा लोकसभेचे खासदार होते. तूफानी सध्या समाजवादी पक्षाच्या तिकिटावर केरकत मतदारसंघातून आमदार आहेत.

Rinku Singh Priya Saroj Engagement
Rinku Singh Priya Saroj Engagement

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news