

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) यांच्यात आज (दि.४) होणाऱ्या अंतिम सामन्याकडे किक्रेटप्रेमींचे लक्ष्य लागले होते. अखेर 'आरसीबी'ने बाजी मारत 'आयपीएल 2025' च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यादरम्यान एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आरसीबीने टॉफी जिंकली अन् महिलेचा घटस्फोट टळला, अशा अशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आरसीबीने आयपीएलचा अंतिम सामना जिंकला नाही, तर मी माझ्या पतीला घटस्फोट देईन, असा मजकूर लिहलेला बँनर महिलेने झळकवला होता. या महिलेने काय विचार करून एवढा मोठा धोका पत्करला, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला होता. अखेर अंतिम सामन्यावर आरसीबीने मोहर उमटवली आणि त्या महिलेचा घटस्फोट टळला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुरूवारी धमाकेदार कामगिरी करत आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. हा सामना चंदीगडमधील मुल्लनपूर येथे झाला होता. या सामन्यादरम्यान लाल साडी परिधान केलेल्या महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. जर 'आरसीबी'ने अंतिम सामन्यात विजय मिळवला नाही, तर मी माझ्या पतीला घटस्फोट देईन, असा मजकूर लिहलेला बँनर या महिलेने झळकवला होता. आपल्या आवडत्या टीमवर विश्वास ठेवून या महिला आपल्या संसारावर तुळसीपात्र ठेवते की काय? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला होता. अखेर आरसीबीने हा अंतिम सामना आपल्या नावावर करत आयपीएलच्या टॉफीवर नाव कोरल्याने त्या महिलेचा घटस्फोट टळला असं म्हणणं गैर नाही.