Riyan Parag: ड्रेसिंग रुममध्ये ई-सिगारेट ओढताना दिसला रियान पराग; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अडचणीत? व्हिडीओ व्हायरल

Riyan Parag Vaping Controversy: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये व्हेपिंग करताना दिसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Riyan Parag Vaping Controversy
Riyan Parag Vaping ControversyPudhari
Published on
Updated on

Riyan Parag Vaping Controversy: रियान पराग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे राजस्थान रॉयल्सचा हा युवा कर्णधार मोठ्या वादात सापडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये बसून व्हेपिंग म्हणजेच ई-सिगारेटचा कश घेताना दिसत आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. कारण भारतात ई-सिगारेटवर बंदी आहे. अशा परिस्थितीत एका मोठ्या क्रिकेट लीगमध्ये खेळणारा खेळाडू, तोही संघाचा कर्णधार, ड्रेसिंग रूममध्ये व्हेपिंग करताना दिसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

२८ एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना सुरू असताना कॅमेऱ्यात एक दृश्य कैद झालं. राजस्थानचा डाव सुरू असताना ड्रेसिंग रूममध्ये बसलेला रियान पराग हातात व्हेप डिव्हाइस घेऊन त्याचा वापर करताना दिसला. काही क्षणांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर टीकेचा भडिमार सुरू झाला.

अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की, भारतात बंदी असलेल्या वस्तूचा वापर एका सार्वजनिक क्रिडा स्पर्धेत कसा केला जाऊ शकतो? त्यातही ड्रेसिंग रूमसारख्या जागेत, जिथे संघातील इतर खेळाडू आणि युवा क्रिकेटर्स उपस्थित असतात.

भारतात ई-सिगारेटवर बंदी का?

भारत सरकारने २०१९ मध्ये ‘प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट अ‍ॅक्ट’ लागू करत ई-सिगारेटवर बंदी घातली होती. या कायद्यानुसार ई-सिगारेटची निर्मिती, विक्री, साठेबाजी आणि वापर यावर निर्बंध आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि तुरुंगवासाची तरतूदही आहे. यामुळेच रियान परागच्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.

राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनावरही प्रश्न

या प्रकरणात फक्त रियान परागच नाही तर राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजमेंटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ड्रेसिंग रूममध्ये अशा प्रकारची गोष्ट घडत असताना संघ व्यवस्थापन कुठे होतं, असा सवाल अनेकांनी केला आहे.

विशेष म्हणजे संघात वैभव सूर्यवंशीसारखे अतिशय युवा खेळाडूही आहेत. अशा वातावरणात वरिष्ठ खेळाडू किंवा कर्णधाराचे वर्तन इतरांवर प्रभाव टाकू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

Riyan Parag Vaping Controversy
PBKS vs RR | राजस्थानने रोखला पंजाबचा अश्वमेघ!

बीसीसीआय काय कारवाई करणार?

आता सर्वांचे लक्ष Board of Control for Cricket in India म्हणजेच बीसीसीआयच्या भूमिकेकडे लागले आहे. या प्रकरणाची दखल घेतली जाणार का? रियान परागवर शिस्तभंगाची कारवाई होणार का? याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Riyan Parag Vaping Controversy
IPL Record: 24 पैकी 20 चेंडू डॉट! RCBच्या खेळाडूची जादुई गोलंदाजी; आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

क्रिकेटपटू हे लाखो तरुणांचे आदर्श मानले जातात. त्यामुळे मैदानावरील कामगिरी इतकंच मैदानाबाहेरील वर्तनही महत्त्वाचं असतं. रियान परागच्या या व्हायरल व्हिडीओनंतर आता त्याच्यावर आणि राजस्थान रॉयल्सवर नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news