Kylian Mbappé : फ्रेंच कपवर ‘पीएसजी’ची मोहर; एम्बाप्पेचा क्लबला अलविदा

Kylian Mbappé : फ्रेंच कपवर ‘पीएसजी’ची मोहर; एम्बाप्पेचा क्लबला अलविदा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस सेंट-जर्मेनने आपला स्टार फुटबॉलपटू एम्बाप्पेच्या निरोपाच्या सामन्यात ल्योनवर 2-1 असा विजय मिळवून फ्रेंच चषकावर मोहर उमटवली. पीएसजीकडून खेळत असलेल्या अखेरच्या सामन्यात एमबाप्पेला एकही गोल करता आला नाही. परंतु, क्लबसोबतच्या सात वर्षांच्या अप्रतिम कामगिरीची दखल घेत त्याच्या सहकाऱ्यांनी अंतिम सामन्यानंतर त्याला हवेत झेलत स्‍मरणीय निराेप दिली. (Kylian Mbappé)

एमबाप्पेने पीएसजीसाठी 308 सामने खेळले, यात त्याने विक्रमी 256 गोल केले. एमबाप्पे पुढील मोसमात स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्यात पीएसजीकडून ओसमान डेम्बेले (22) आणि फॅबियन रुईझ (34) यांनी पहिल्या हाफमध्ये केले. तर लियॉनसाठी एकमेव गोल जॅक ओब्रायनने (55) केला.

लेव्हरकुसेनने जिंकला जर्मन कप

युरोपा लीग फायनलमध्ये अटलांटाकडून 0-3 अशा पराभवानंतर बायर लेव्हरकुसेनने घरच्या मैदानावर अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला. त्यांनी जर्मन कप फायनलमध्ये कैसरस्लॉटर्नचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. काही दिवसांपूर्वी प्रथमच बुंडेस्लिगा जिंकणाऱ्या बायरचे या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे. प्रशिक्षक झाबी अलोन्सोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बायरसाठी ग्रॅनिट झाकाने 16व्या मिनिटाला एकमेव गोल केला. बायरने या मोसमात घरच्या मैदानावर एकही सामना गमावला नाही. मायदेशात आणि युरोपमधील सर्व स्पर्धांमध्ये त्याने एकूण 53 सामने खेळले, त्यात त्यांचा एकमेव पराभव अटलांटाकडून झाला.

बार्सिलोनाच्या महिला यूईएफए महिला चॅम्पियन्स

पुरुषांप्रमाणेच लियॉनच्या महिलांनाही यूईएफए महिला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत बार्सिलोनाकडून पराभव स्वीकारावा लागला. बार्सिलोनाने लियोनचा 2-0 असा पराभव करून गेल्या चार हंगामात तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले. जगातील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐताना बोनामतीने उत्तरार्धात बार्सिलोनासाठी गोल केला.  एक्स्ट्रा टाईमध्ये अलेक्सिया पुटेलासने बार्सिलोनासाठी दुसरा गोल केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news