

बुडापेस्ट; वृत्तसंस्था : पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाने चॅम्पियन्स लीगच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अर्सेनलवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा थरारक विजय मिळवत. या ऐतिहासिक विजयासह आपले जेतेपद राखण्यात यश मिळवले.
‘पीएसजी’ने यासह आतापर्यंत खेळलेल्या सलग 6 पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवण्याचा अनोखा विक्रम केला आहे. याआधी 2016 ते 2018 दरम्यान रिअल माद्रिदने सलग तीन जेतेपदे पटकावली होती. त्यानंतर सलग दोनदा चॅम्पियन्स लीग जिंकणारा पीएसजी हा पहिलाच क्लब ठरला आहे.
पुस्कास एरेना मैदानावर झालेल्या या सामन्यात निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर गेला. अर्सेनलचा बचावपटू गॅब्रिएलने मारलेली किक ‘पीएसजी’चा गोलरक्षक माटवे साफोनोव्हच्या गोलपोस्टच्या वरून हवेत गेली. या एका चुकीमुळे अर्सेनलचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले.