पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारने उंच उडीत जिंकले सुवर्ण

2024 Paris Paralympics | भारताच्या प्रवीण कुमारने इतिहास रचला
2024 Paris Paralympics, Praveen Kumar
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी -T64 इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताच्या प्रवीण कुमारने (Praveen Kumar) पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने पुरुषांच्या उंच उडी -T64 इव्हेंटमध्ये (Men's High Jump T64 final event) सुवर्णपदक जिंकले. त्याने अंतिम फेरीत २.०८ मीटर उंच उडीसह सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. प्रवीण कुमारचे हे पॅरालिम्पिकमधील हे सलग दुसरे पदक आहे. याआधी त्याने २०२१ टोकियो पॅरालिम्पिकचा रौप्यपदक जिंकले होते.

प्रवीणने यापूर्वी २०२१ टोकियो पॅरालिम्पिकमध्ये २.०७ मीटर उंच उडीसह रौप्यपदक मिळवले होते. आता त्याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये २.०८ मीटरच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसह सुवर्ण कामगिरी केली.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील २१ वर्षीय प्रवीण हा पॅरालिम्पिकच्या उंच उडी इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा मरियप्पन थंगावेलू नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने अंतिम फेरीतील ६ स्पर्धकांत २.०८ मीटरच्या विक्रमासह पोडियमवर अव्वल स्थान मिळवले.

अमेरिकेच्या डेरेक लोकिडेंटने २.०६ मीटर उंच उडीसह रौप्यपदक मिळवले, तर उझबेकिस्तानचा टेमुरबेक गियाजोव्ह २.०३ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह तिसऱ्या स्थानी राहिला.

2024 Paris Paralympics : भारताची पदकसंख्या २६ वर

या कामगिरीसह प्रवीण पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळविणारा तिसरा भारतीय ॲथलिट ठरला. भारताच्या शरद कुमारने उंच उडी T63 इव्हेंटमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर आता प्रवीण कुमारने आता सुवर्ण जिंकले आहे. यामुळे भारताची पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकसंख्या आता २६ पदके झाली आहे. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि ११ कांस्यपदकांचा समावेश आहे.

2024 Paris Paralympics, Praveen Kumar
19 वर्षीय मुशीरने रचला इतिहास! सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news