

pm narendra modi meet cricketer vaibhav suryavanshi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे 2025 रोजी पाटणा विमानतळावर युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. वयाच्या 14व्या वर्षी आयपीएल 2025 मध्ये राजस्थन रॉयल्स संघाकडून खेळणारा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू आहे. या भेटीत पंतप्रधानांनी वैभवच्या क्रिकेटमधील यशाचे कौतुक केले आणि त्याच्या इंग्लंड दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हटले, ‘वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेट कौशल्याची देशभरात प्रशंसा होत आहे. त्याच्या भविष्याच्या प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.’ या भेटीमुळे वैभव आणि त्याच्या कुटुंबाचा उत्साह वाढला असून, त्याच्या प्रतिभेची देशभरात चर्चा होत आहे.
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने त्याच्या फलंदाजीच्या प्रतिभेने सर्वांना नक्कीच प्रभावित केले. पंतप्रधान मोदी यांनाही वैभवच्या डावखु-या फलंदाजीची भुरळ पडली. ते बिहारी फलंदाजाचे चाहते बनले. बिहारच्या पाटना विमानतळावर त्यांनी वैभव सुर्यवंशी आणि त्याच्या आई-वडिलांची भेट घेतली. या भेटीचे फोटो पीएम मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, पाटणा विमानतळावर युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. वैभवच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे. विशेषत: त्याने आयपीएलमध्ये केलेली कामगिरी लक्षवेधी आहे. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.’
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाख रुपयांना विकते घेतले होते. त्याला लीग स्टेजमधील लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. तो यासह आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात युवा खेळाडू बनला. याशिवाय, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात केवळ 35 चेंडूत शतक करून वैभव आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारतीय खेळाडू बनला.
वैभवने एकूण 7 सामन्यांमध्ये 36 च्या सरासरीने आणि 206.56 स्ट्राइक रेटने 252 धावा फटकावल्या. या दरम्यान, त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक झळकले. आयपीएल 2025 चा हंगाम राजस्थान रॉयल्स संघासाठी काही खास नव्हता आणि त्यांचा प्रवास लीग स्टेजमध्येच संपुष्टात आला.