पुढारी ऑनलाईन डेस्क : Vinesh Phogat CAS Verdict : सीएएसने विनेश फोगाटची याचिका फेटाळून मोठा झटका दिला आहे. CAS च्या या निर्णयामुळे विनेशला रौप्यपदक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये, विनेश फोगटला 50 किलो फ्रीस्टाइलच्या अंतिम सामन्यापूर्वी निर्धारित वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या निर्णयाला विरोध दर्शवला होता. यानंतर विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मध्ये अपील केले. विनेशला रौप्यपदक मिळेल, अशी अपेक्षा होती.
या निर्णयाचा सविस्तर आदेश यापूर्वीच जारी करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. ॲनाबेले बेनेट एसी एससी निकाल दिला. यापूर्वी सीएएसने निकाल देण्याची तारीख 10 ऑगस्ट ठेवली होती. सहसा पॅनेलला निर्णय देण्यासाठी 24 तास दिले जातात. मात्र या खटल्याचा निकाल देण्यासाठी तारखांवर तारखा पडल्या. त्यानंतर या प्रकरणाचा निर्णय 13 ऑगस्टला दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होता, मात्र निर्णयाची तारीख 16 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. मात्र त्यापूर्वीच बुधवारी (दि. 14) हा निर्णय जाहीर करण्यात आला. ज्यात याचिका फेटाळल्याचे समोर आले.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांनीही या प्रकरणी निराशा व्यक्त केली आहे. हा निर्णय ऐकून आश्चर्य वाटल्याचेही त्यांनी सांगितले.
पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान, विनेशने 6 ऑगस्ट रोजी सलग 3 सामने खेळून 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्णपदकाचा सामना 7 ऑगस्टच्या रात्री होणार होता, पण त्या दिवशी सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे समोर आले. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले.
यानंतर विनेशने सीएएसमध्ये अपील केले होते. सुवर्णपदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, ही तिची पहिली मागणी होती. मात्र नियमांचा हवाला देत ती मागणी तात्काळ फेटाळण्यात आली. यानंतर विनेशने आवाहन करत तिला या स्पर्धेत रौप्य पदक मिळावे अशी मागणी केली. आता हे अपीलही फेटाळण्यात आले आहे.