Paris Olympics 2024 : भारतीय नेमबाजांवर सर्वांच्या नजरा! चीननंतर सर्वात मोठा ताफा

काही नेमबाज वेगवेगळ्या शूटिंग इव्हेंटमध्ये भाग घेणार
Paris Olympics 2024 India Shooting Team
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे एकूण 21 नेमबाज सहभागी होत आहेत. चीननंतर (22) हा सर्वात मोठा नेमबाजांचा ताफा आहे.Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 India Shooting Team : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 26 जुलैपासून ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. भारतीय खेळाडूंकडून मागच्या वेळेपेक्षा (टोकियो 2020) अधिक पदकांची अपेक्षा आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे एकूण 21 नेमबाज सहभागी होत आहेत. चीननंतर (22) हा सर्वात मोठा नेमबाजांचा ताफा आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यंदा 21 भारतीय नेमबाज पदकासाठी निशाणा साधणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून चांगली कामगिरी झाली नव्हती, पण यावेळी चित्र थोडे वेगळे असू शकते. काही नेमबाज वेगवेगळ्या शूटिंग इव्हेंटमध्ये भाग घेताना देखील दिसणार आहेत. त्यामुळे या शूटिंगमध्ये पदक मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘या’ नेमबाजांकडून सर्वाधिक अपेक्षा

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताकडून सहभागी होणाऱ्या नेमबाजांमध्ये काही नेमबाजी खेळाडू आहेत ज्यांच्याकडून पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. यामध्ये मनू भाकरचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ती 3 वेगवेगळ्या शूटिंग इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. याशिवाय ऑलिम्पिक स्पर्धेत यापूर्वीच सहभागी झालेले ऐश्वर्य तोमर, इलावेनिल वालारिवन, मुदगिल यांच्याकडून सर्वांना अपेक्षा असतील. यावेळी भारतीय नेमबाजांना त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षकांनाही सोबत घेऊन जाण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. पण या प्रशिक्षकांना क्रीडाग्राममध्ये राहता येणार नाहीय. त्यांची व्यवस्था जवळच्या हॉटेलमध्ये केली जाईल.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणारे भारतीय नेमबाज

  • इलावेनिल वालारिवन आणि रमिता जिंदाल : महिला 10 मीटर एअर रायफल इव्हेंट

  • मनू भाकर आणि रिदम सांगवान : महिला 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंट

  • मनू भाकर आणि ईशा सिंग : महिला 25 मीटर पिस्तुल इव्हेंट

  • सिफ्त कौर सामरा आणि अंजुम मुदगिल : महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंट

  • सरबज्योत सिंग आणि मनू भाकर : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक इव्हेंट

  • अर्जुन चीमा आणि रिदम सांगवान : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक इव्हेंट

  • सरबज्योत सिंग आणि अर्जुन चीमा : पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंट

  • संदीप सिंग आणि इलावेनिल : 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक इव्हेंट

  • अर्जुन चीमा आणि रमिता जिंदाल : 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक इव्हेंट

  • ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि स्वप्नील कुसाळे : पुरुष 50 मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंट

  • अनिश भानवाला आणि विजयवीर सिंधू : पुरुष 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल इव्हेंट

  • संदीप सिंग आणि अर्जुन बाबुता : पुरुष 10 मीटर एअर रायफल इव्हेंट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news