Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28 सदस्यीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा करणार संघाचे नेतृत्व
Paris Olympics 2024
भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने (AFI) 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28 सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा केली.Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris 2024 Olympics : भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने (AFI) 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28 सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यावेळी नीरज चोप्रासोबत किशोर जेना हा ही भाला फेकताना दिसणार आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी अन्नू राणी महिलांच्या भालाफेक स्पर्धेत भाग घेणार आहे. 28 जणांच्या या ॲथलेटिक्स संघात 17 पुरुष, 11 महिला खेळाडूंचा समावेश आहे.

नीरज करणार नेतृत्व

Summary
  • पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरु होणार असून सांगता 11 ऑगस्टला होणार आहे.

  • या स्पर्धेसाठी जगभरातील खेळाडू सज्ज झाले आहेत.

  • नीरज चोप्रा 28 सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व करणार आहे.

  • त्याने नुकतेच फिनलंडमध्ये झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधील 8 खेळाडूंचा सहभाग

नीरज चोप्रा आणि अन्नू राणी व्यतिरिक्त पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस ॲथलीट अविनाश साबळे, आशियातील अव्वल शॉट पुटरपैकी एक तजिंदरपाल सिंग तूर, महिला रेस वॉकर प्रियांका गोस्वामी आणि 4x400 मीटर रिले धावपटू मोहम्मद अनस, अमोज पार्टिकन टू सुब्बा जॅकोटेड तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये सहभागी झाले होते. अनसचे हे सलग तिसरे ऑलिम्पिक असणार आहे.

‘आशियाई’ सुवर्णपदक विजेती पारुल चौधरी करणार कमाल?

पारुल चौधरी 3000 मीटर स्टीपलचेस आणि 5000 मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे. दोन वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी निवडलेली ती एकमेव खेळाडू आहे. गेल्या वर्षी तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक तर 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक पटकावले होते. राष्ट्रीय विक्रमवीर अक्षदीप सिंग, विकास सिंग आणि परमजीत सिंग बिश्त पुरुषांच्या 20 किमी रेस वॉक स्पर्धेत भाग घेतील. तर सूरज पनवार मिश्र मॅरेथॉन स्पर्धेत प्रियंका गोस्वामी सोबत सहभीगी होईल.

पुरुष संघ :

अविनाश साबळे (3,000 मीटर स्टीपलचेस), नीरज चोप्रा, किशोर कुमार जेना (भालाफेक), तजिंदरपाल सिंग तूर (शॉट पुट), प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबुबकर (ट्रिपल जंप), अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त (20 किमी वॉक रेस), मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश (4x400 मीटर रिले), मिजो चाको कुरियन (4x400 मीटर रिले), सूरज पनवार (वॉक मिक्स्ड मैराथन), सर्वेश अनिल कुशारे (उंच उडी).

महिला संघ :

किरण पहल (400 मीटर), पारुल चौधरी (3,000 मीटर स्टीपलचेस आणि 5,000 मीटर), ज्योती याराजी (100 मीटर अडथळा), अन्नू राणी (भालाफेक), आभा खटुआ (शॉट पुट), ज्योतिका श्री दांडी, सुभा व्यंकटेशन, विठिया रामराज, पूवम्मा एमआर (4x400 मीटर रिले), प्राची (4x400 मी), प्रियांका गोस्वामी (20 किमी वॉक रेस).

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news