Paralympics Games Paris 2024 : शीतलचा वर्ल्ड रेकॉर्ड; पण अव्वल स्थान गेले
पॅरिस : जन्मतः दोन्ही हात नसलेली शीतल देवी पायाने तिरंदाजी करते आणि मागच्या वर्षी आशियाई ‘सुवर्ण’ जिंकून तिने इतिहास घडवला. गुरुवारी तिने पॅरालिम्पिक स्पर्धेतही वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. 700 हून अधिक गुण कमावणारी ती पहिली भारतीय तिरंदाज ठरली, परंतु अवघ्या 1 गुणाच्या फरकाने तिचे ‘नंबर वन’ स्थान गेले.
कंपाऊंड फेरीत भारताच्या पॅरा तिरंदाज शीतल देवीने पॅरिस 720 पैकी 703 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड केला. शीतलने मागच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या जेसिका स्ट्रेटॉनचा 694 गुणांचा पॅरालिम्पिक विक्रम आणि ग्रेट ब्रिटनच्याच फोबी पॅटरसनचा 698 गुणांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; पण शीतलचा वर्ल्ड रेकॉर्ड गुरुवारीच तुर्कीच्या ओझनूर क्युरने काही क्षणात मोडला आणि तिने 704 गुणांसह वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला