श्शू शांतता राखा ! फुटबॉल सामना सुरु आहे..!

Paralympic अंध फुटबाॅल सामना प्रेक्षकांना देतो एक अकल्‍पनीय अनुभव
Paralympics 2024
पॅरालिम्पिकमधील फुटबाॅल सामना शांतता आणि जल्‍लोष यांचे मिश्रण किती अकल्‍पनीय आहे याची प्रचीती प्रेक्षकांना देताे. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खेळाडूंच्‍या धावण्‍याचा वेग वार्‍याशी स्‍पर्धा करणारा... या वेगाला प्रेक्षकांच्‍या बेभान जल्‍लोषाची साथ... आपल्‍या संघाला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी एकाच सुरातील प्रचंड जयघोषाचा नाद... खेळातील वाढत्‍या रोमांच्‍याबरोबरच प्रेक्षकांचा ओसांडू वाहणारा उत्‍साह...हे सारं काही तुम्‍ही केवळ ९० मिनिटांचा फुटबॉल सामन्‍यात अनुभवू शकता. या खेळाप्रमाणेच त्‍याचे प्रेक्षकही आक्रमक बाण्‍यासाठी ओळखले जातात. म्‍हणूनच शांतता राखा, फुटबॉल सामना सुरु आहे, हे वाचून तुम्‍ही क्षणभर अचंबित झाला असाल;पण पॅरालिम्पिकमध्‍ये हे घडतं. या स्‍पर्धेतील फुटबॉल सामने प्रेक्षकांना शांतता आणि जल्‍लोष यांचे मिश्रण किती अकल्‍पनीय आहे याचीच प्रचीती देतात. ( paralympics 2024 )

Paralympic : कसा असतो अंध खेळाडूंचा फूटबॉल सामना?

सध्‍या पॅरिसमध्‍ये पॅरालिम्पिक सुरु आहे. येथील आयफेल टॉवर स्‍टेडियमध्‍ये अंध खेळाडूंच्‍या फूटबॉल सामन्‍यासाठी आयफेल स्टेडियममध्‍ये मोठी गर्दी होत आहे. सामना सुरु झाला की प्रेक्षक अचानक शांत होतात आणि आणि अचानक जल्‍लोष हे सारं वातावरण फुटबॉल प्रेक्षकांसाठीही अकल्पनीय असते. अंध फुटबॉलमध्‍ये चेंडूमध्ये एक घंटा असते. चेंडूतील या घंटेच्‍या धन्‍वीच्‍या आधारे खेळाडू चेंडूचा अंदाज घेत आपली चाल करतात. खेळाडू मैदानात एकमेकांना ओरडून इशारेही देतात. मात्र यासाठी मैदानावर शांतता आवश्‍यक असते. प्रेक्षकांचा गोंगाट हा खेळाडूंसाठी अडसर ठरतो. मग प्रेक्षकांची भूमिका येथे महत्त्‍वपूर्ण राहते. फुटबॉल खेळ सुरु असताना शांतता आणि गोल चुकली किंवा झाली तर जल्‍लोष अशी दुहेरी भूमिका प्रेक्षकांना बजावावी लागते. अशावेळी लाउडस्पीकरमधून प्रेक्षकांना शांत राहण्‍यासाठी शिट्टी वाजते. अचानक, प्रेक्षक शांत होतात. यानंतर जेव्‍हा समालोचक सूचना करतो तेव्‍हा चाहत्‍यांना जल्‍लोष करण्‍याची परवानगी मिळते. ( paralympics 2024 )

Paralympics 2024
अंध खेळाडूंचा फुटबॉल सामना प्रेक्षकांना जल्‍लोष बरोबरच मौन आणि शांतता याचाही आनंद देतो.(Image source- X)

मौन आणि जल्‍लोष दोन्‍हींचा अकल्‍पनीय अनुभव

खेळ कोणताही असो यामध्‍ये प्रेक्षकांचा जल्‍लोष असतोच. मात्र अंध खेळाडूंचा फुटबॉल सामना प्रेक्षकांना जल्‍लोष बरोबरच मौन आणि शांतता याचाही आनंद देतो. नवीन प्रेक्षकांसाठी हे थोडे गोंधळणारे होते मात्र केवळ पॅरालिम्पिकमधील फुटबॉल सामनेच तुम्‍हाला मौन आणि जल्‍लोषांचा अनुभव देतात, असे प्रेक्षक सांगतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news