पॅरालिम्पिकमध्‍ये मराठमोळ्या सचिन खिलारीने रचला इतिहास, गोळाफेकमध्‍ये पटकावले रौप्‍य पदक

Paralympics : ४० वर्षांनतर गोळाफेकमध्‍ये भारताने जिंकले पदक
Paralympics 2024
पॅरिस पॅरालिम्पिकच्या सातव्‍या दिवशी भारताच्या सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावले.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावले. त्‍याच्‍या या कामगिरीमुळे भारताने ४० वर्षांनंतर पॅरालिम्पिकमध्‍ये गोळाफेक क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने या क्रीडा प्रकारात पदक जिंकले होते. सचिनच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या पदकांची संख्या २१ झाली आहे.

सचिनचे सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकले

सचिन खिलारीने आज१६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने 16.38 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक तर कांस्यपदक क्रोएशियाच्या लुका बाकोविच याने मिळवले. या स्पर्धेत भारताचा मोहम्मद यासर आठव्या तर रोहित कुमार नवव्या स्थानी राहिला.

गोळाफेक अंतिम फेरीत सचिनचा पहिला प्रयत्न 14.72 मीटर, दुसरा 16.32 मीटर, तिसरा 16.15 मीटर, चौथा 16.31 मीटर, पाचवा प्रयत्न 16.03 मीटर आणि सहावा (शेवटचा) प्रयत्न 15.95 मीटर होता. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे हे 21 वे पदक ठरले आहे. सचिनने 2023 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2024 च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदकावर मोहोर उमटवले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news