PAK vs ENG | पाकिस्तानचा कसोटी इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव!

इंग्लंडने पहिला कसोटी सामना एक डाव, ४७ धावांनी जिंकून रचला इतिहास
Pakistan vs England 1st Test
कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि ४७ धावांनी पराभव केला.(Image source- ICC)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील (Pakistan vs England 1st Test) कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने आज शुक्रवारी पाकिस्तानचा एक डाव आणि ४७ धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पाकिस्तानचा हा सर्वात मोठा पराभव आहे. पहिल्या डावात ५५६ धावा केल्यानंतर एक डाव आणि धावांच्या फरकाने पराभूत होण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे.

मुलतान कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लिश फलंदाजांनी यजमान पाकिस्तानच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली होती. प्रथम फलंदाजी करताना पाकने त्यांच्या पहिल्या डावात ५५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुण्या इंग्लंडने ७ गडी गमावून ८२३ धावांचा डोंगर रचला. मात्र पाकचा दुसरा डाव २२० धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व राखले.

PAK vs ENG : पाकिस्तानचा सलग सहाव्या कसोटीत पराभव

कसोटी किक्रेटमधील पाकिस्तानचा हा सलग सहावा पराभव आहे. तर गेल्या ९ कसोटी सामन्यात पाकिस्तानची हा सातवा पराभव आहे.

Pakistan vs England 1st Test : इंग्लंडने मारली बाजी

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत यजमान पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात ३७ षटकात ६ गडी गमावून १५२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला पराभव टाळण्यासाठी आणखी ११५ धावांची गरज होती. पण अखेरच्या दिवशी त्यांना १७.५ षटकांत ६८ धावा करता आल्या आणि त्यांनी उर्वरित चार विकेट गमावल्या. गोलंदाजीसाठी पोषक नसलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडने सहज विजय मिळवला.

त्रिशतकी खेळी करणाऱ्या हॅरी ब्रूकला सामनावीर पुरस्कार

पाकिस्तानच्या आमेर जमालने बिनबाद अर्धशतकी खेळी केली. तर सलमान अली आगा याने ६३ धावा करुन आऊट झाला. त्रिशतकी खेळी करणाऱ्या इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याला सामनावीर पुरस्कार मिळाला. हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत त्रिशतक झळकावून इतिहास रचला. त्याने हे त्रिशतक अवघ्या ३१० चेंडूत पूर्ण केले. त्याने ३२२ चेंडूत ३१७ धावांची खेळी खेळली.

पाकिस्तानचा दुसरा डाव २२० धावांवर गुंडाळला

पाकिस्तानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात १४९ षटकांत ५५६ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने १५० षटकांत ७ बाद ८२३ धावांवर त्यांचा पहिला डाव घोषित केला. पाकिस्तानचा दुसरा डाव ५४.५ षटकांत सर्वबाद २२० धावांवर गुंडाळला.

Pakistan vs England 1st Test
अबब! इंग्लंडच्या पहिल्या डावात 823 धावा, पाकिस्तान गोलंदाजीची धु धु धुलाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news