पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan vs England Test : मुलतान कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लिश फलंदाजांनी यजमान पाकिस्तानच्या गोलंदाजांची धु धु धुलाई करत हाहाकार माजवला. प्रथम फलंदाजी करताना पाकने त्यांच्या पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुण्या इंग्लंडने 7 गडी गमावून 823 धावांचा डोंगर रचला.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ चार वेळाच एका डावात 800 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. यापैकी इंग्लंड संघाने तीन वेळा हा चमत्कार केला आहे. तर श्रीलंकन संघाला अशी कामगिरी एकदा करता आली आहे. तर 900 हून अधिक धावा केवळ दोनवेळाच झाल्या आहेत. ज्यात श्रीलंका अव्वल स्थानी आहे.
मुलतान कसोटीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 149 षटकात सर्व गडी गमावून 556 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 150 षटके खेळली आणि 7 गडी गमावून 823 धावांवर डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लंडने 267 धावांची आघाडी घेतली. या सामन्यात अजून 130 षटके बाकी आहेत. जर इंग्लंडने पाकिस्तानला 267 धावांच्या आधी ऑल आऊट केले तर इंग्लंडचा डावाने विजय पक्का आहे.
श्रीलंका 6 बाद 952 (डाव घोषित) : विरुद्ध भारत : 1997 (कोलंबो)
इंग्लंड 7 बाद 903 (डाव घोषित) : विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 1938 (ओव्हल)
इंग्लंड 849 : विरुद्ध वेस्ट इंडिज : 1930 (किंग्स्टन)
इंग्लंड 7 बाद 823 (डाव घोषित) : विरुद्ध पाकिस्तान : 2024 (मुलतान)
वेस्ट इंडिज 3 बाद 790 : विरुद्ध पाकिस्तान : 1958 (किंग्स्टन)
पाकिस्तान 6 बाद 765 : विरुद्ध श्रीलंका : 2009 (कराची)