काँग्रेस सरकारने केला होता गीता-बबिताशी भेदभाव : महावीर फोगाट

Mahavir Phogat : राज्यसभेची खासदारकी देण्याच्या विधानाचा घेतला समाचार
Mahavir Phogat vs Congress
भूपेंद्र हुड्डा आज जे बोलत आहेत ती निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे, असा टोला महावीर फोगाट यांनी लगावला आहे. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mahavir Phogat vs Congress : ‘विनेश फोगाटला राज्यसभेवर पाठवण्याची आमची इच्छा आहे. पण आमचे केवळ 28 आमदार आहेत. या संख्याळाच्या जोरावर आमचा उमेदवार राज्यसभेचा खासदार होऊ शकत नाही. जर आमची आमदार संख्या जास्त असती तर आम्ही तिला राज्यसभा खासदार केले असते,’ असे विधान हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून विनेश फोगाटचे काका महावीर फोगाट चांगले भडकले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देत भुपेंद्र हुड्डा यांचा समाचार घेतला आहे.

विनेशला राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला उत्तर देताना महावीर फोगाट म्हणाले की, भूपेंद्र हुड्डा हरियाणाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गीता आणि बबिता यांच्याशी भेदभाव केला होता. भूपेंद्र हुड्डा आज जे बोलत आहेत ती निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे,’ असा टोला लगावला आहे.

हुड्डा यंच्यावर भेदभावाचा आरोप

महावीर फोगट म्हणाले की, भूपेंद्र हुड्डा विनेशला राज्यसभेवर पाठवा असे सांगत आहेत, पण त्या आधी गीता फोगटला त्यांच्या सरकारच्या काळात राज्यसभेवर का पाठवले नाही? 2005 आणि 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या तेव्हा बबिता फोगटने रौप्यपदक तर गीता फोगटने सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू होती. त्यानंतर 2012 मध्ये गीता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली. त्यावेळी हुड्डा यांचेच सरकार होते आणि गीता-बबिता यांना डीएसपी बनवायचे होते, पण हुड्डा यांनी भेदभाव करून गीताला इन्स्पेक्टर आणि बबिताला सब इन्स्पेक्टर बनवले. या प्रकरणी आम्हाला कोर्टात जावे लागले. तिथे आम्हाला न्याय मिळवला.’

‘विनेशला राज्यसभा खासदार करा : दीपेंद्र हुड्डा

त्याचवेळी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा म्हणाले की, ‘विनेश हरली नाही, तर तिने देशवासीयांची मने जिंकली आहेत. खरेतर खेळ प्रणाली हरली आहे. सुवर्णपदक विजेत्याला ज्या सुविधा दिल्या जातात त्या सरकारने तिला उपलब्ध करून द्याव्यात. आज हरियाणामध्ये राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. आमच्याकडे बहुमत नाही, पण खासदार होण्यासाठी देशात योग्य कोणी असेल तर ती विनेश आहे. कारण ती जगासाठी आणि देशासाठी प्रेरणा आणि धैर्याचे प्रतीक म्हणून उदयास आली आहे.’

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news