Neeraj Chopra : '९० मीटर'ला हुलकावणी, तरीही नीरजची 'पॅरिस डायमंड लीग'वर मोहोर

प्रतिस्‍पर्धी ज्युलियन वेबर ८६.२० मीटरसह राहिला दुसऱ्या क्रमांकावर
Neeraj Chopra
नीरज चाेप्रा. File Photo
Published on
Updated on

८८.१६ मीटर भालाफेक करत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने या वर्षीच्‍या पहिले विजेतेपद पॅरिस डायमंड लीगवर आपल्‍या नावाची मोहोर उमटवली. अंतिम फेरीत ९० मीटरचा टप्‍पा ओलांडू शकला नसला तरी त्‍याने पहिल्‍या थ्रोच्‍या आधारे जेतेपद निश्‍चित केले. २०२३ च्या लॉसनेनंतर डायमंड लीग स्पर्धेतील नीरजचा हा पहिलाच विजय ठरला आहे.

ज्युलियन वेबर राहिला दुसऱ्या क्रमांकावर

पॅरिस डायमंड लीगचा सामना २० जून रोजी झाला. अंतिम फेरीत नीरजला ६ पैकी फक्त तीनच थ्रो करता आले. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटर थ्रो करून चांगली सुरुवात केली.तेव्हा सर्वांच्या नजरा वेबरवर होत्या. त्‍याने त्याच्या सहा प्रयत्नांमध्ये नीरजवर दबाव कायम ठेवला. केशॉर्न वॉलकॉटने अँडरसन पीटर्सला हरवून टॉप थ्रोमध्ये स्थान मिळवले होते .नीरजचा दुसरा प्रयत्न देखील चांगला होता, त्याने ८५.१० मीटर थ्रो केला. यानंतर नीरजने सलग तीन फाऊल थ्रोची हॅटट्रिक केली. , वेबर सुरुवातीला नीरजने ठेवलेला विक्रम ओलांडू शकला नाही. वेबर त्याच्या पहिल्या प्रयत्नापेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही आणि ८६.२० मीटरसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. २०२३ च्या लॉसनेनंतर डायमंड लीग स्पर्धेत नीरजचा हा पहिलाच विजय होता आणि एकूण पाचवा क्रमांक होता.

Neeraj Chopra
Neeraj Chopra Indian Army : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला ‘लेफ्टनंट कर्नल’पदी बढती!

आता ऑस्‍ट्रावा येथे होणार्‍या स्‍पर्धेकडे सर्वांचे लक्ष

मॉरिसियो लुईझ दा सिल्वाने ८६.२० मीटर थ्रो करून टॉप-३ मध्ये प्रवेश केल्याने वॉलकॉटची तिसऱ्या स्थानावरील पकड संपली. नीरजने त्याचा शेवटचा थ्रो ८२.८९ मीटर अंतरावर फेकला. नीरज आता २४ जून रोजी चेक प्रजासत्ताकमधील ओस्ट्रावा येथे होणाऱ्या गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स मीटमध्ये भाग घेईल. त्यानंतर, तो ४ जुलै रोजी क्लासिक स्‍पर्धेतही तो सहभागी होणार आहे.

Neeraj Chopra
हिमानी मोर कोण आहे? जी बनली नीरज चोप्राची जीवनसाथी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news