Neeraj Chopra CWG 2026: नीरज चोप्रासह तिघा भारतीयांची फायनलमध्ये धडक! जाणून घ्या, कधी रंगणार 'राष्‍ट्रकूल'मधील मेडलचा थरार?

पात्रता फेरीत नीरजने ७९.६१ मीटरचा सर्वोत्तम थ्रो नोंदवला
Neeraj Chopra CWG 2026
Neeraj Chopra CWG 2026File Photo
Published on
Updated on

Neeraj Chopra CWG 2026 : स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ (CWG 2026) चा आज आठवा दिवस भारतीय चाहत्यांसाठी खास ठरला. गुरुवारी भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुरुषांच्या जॅव्हलिन थ्रो प्रकारात चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता फेरीत (Qualifying Round) नीरजने ७९.६१ मीटरचा सर्वोत्तम थ्रो नोंदवला.

नीरजसह तीन भारतीय भालाफेकपटू फायनलमध्‍ये

स्कॉटस्टौन स्टेडियमवर पार पडलेल्या या फेरीत केवळ नीरजच नाही, तर भारताच्या रोहित यादव आणि यशवीर सिंह यांनीही अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. रोहितने ७८.३७ मीटर आणि यशने ७८.३६ मीटर भालाफेक केली. पहिल्या दोन प्रयत्नांतच पदकाची फेरी पक्की झाल्यामुळे नीरजने तिसरा प्रयत्न घेतलाच नाही.

Neeraj Chopra CWG 2026
Commonwealth Games 2026: राष्ट्रकुलमध्ये भारताचा दबदबा कायम; श्रीशंकरची 'रौप्य'उडी, तर दिलीप गावितचा विक्रमी 'सुवर्ण'वेध

पात्रता फेरीत १४ देशांतील एकूण १८ भालाफेकपटू रिंगणात

पात्रता फेरीत १४ देशांतील एकूण १८ भालाफेकपटू रिंगणात होते, ज्यापैकी सर्वोत्तम १२ खेळाडूंनी फायनल गाठली. या फेरीत ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनसाठी ८४ मीटरचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र, एकाही ॲथलीटला हा टप्पा गाठता आला नाही; त्यामुळे अव्वल १२ खेळाडूंना थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला.

कधी रंगणार 'राष्‍ट्रकूल'मधील मेडलचा थरार?

आता सर्वांचे लक्ष लागलेला मेडल इव्हेंट शुक्रवारी रात्री उशिरा ( १ ऑगस्‍ट 12 : 45) वाजता रंगणार आहे. पात्रता फेरीत श्रीलंकेच्या रुमेश पथिराजने ८२.८४ मीटरचा सर्वाधिक दूर भाला फेकत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, पाकिस्तानच्या अरशद नदीमने ७८.६३ मीटर थ्रोसह फायनलमध्ये जागा मिळवली आहे. अरशद हा या स्पर्धेतील विद्यमान विजेता असून त्याने २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत ९०.१८ मीटरच्या विक्रमी थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते. इतकेच नव्हे तर तो सध्याचा ऑलिंपिक चॅम्पियनही आहे.

पुन्‍हा एकदा सुवर्णवेध घेण्‍यासाठी नीरज सज्‍ज

दोन वेळेचा ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्रा याने २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत ८६.४७ मीटर फेकीसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. आता पुन्हा एकदा सुवर्णवेध घेण्यासाठी नीरज सज्ज झाला आहे.

Neeraj Chopra CWG 2026
commonwealth games 2026 : उद्घाटनाआधीच धमाका! भारताचे पहिले पदक निश्चित! ; जाणून घ्या कसं घडलं हे 'सरप्राइज'!

फायनलमध्ये धडक मारलेले अव्वल १२ भालाफेकपटू

  1. रुमेश पथिराज (श्रीलंका) – ८२.८४ मीटर

  2. एंडरसन पीटर्स (ग्रेनाडा) – ८१.२९ मीटर

  3. डाऊ स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – ८०.६४ मीटर

  4. बेन ईस्ट (इंग्लंड) – ८०.३८ मीटर

  5. नीरज चोप्रा (भारत) – ७९.६१ मीटर

  6. कॅमेरॉन मॅकइंटायर (ऑस्ट्रेलिया) – ७८.९१ मीटर

  7. अरशद नदीम (पाकिस्तान) – ७८.६३ मीटर

  8. कीशॉन स्ट्रॅचन (बहामास) – ७८.६० मीटर

  9. रोहित यादव (भारत) – ७८.३७ मीटर

  10. यशवीर सिंह (भारत) – ७८.३६ मीटर

  11. केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो) – ७८.२६ मीटर

  12. चिनेचेरेम न्नामदी (नायजेरिया) – ७५.२७ मीटर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news