Navjot Sidhu property | नवजोत सिद्धूंनी केले संपत्तीचे वाटप: मुलीला मिळाले आलिशान घर, तर मुलाच्या वाट्याला काय?

Navjot Sidhu property |पत्नी नवजोतशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर घेतला संपत्ती वाटपाचा निर्णय
Navjot Sidhu property
Navjot Singh Sidhu / Facebook
Published on
Updated on

Navjot Sidhu property

चंदीगड: माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे ज्येष्ठ नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी आपल्या संपत्तीचे वाटप केले आहे. त्यांनी मुलगा आणि मुलगी यांच्या नावे आपली मालमत्ता केली असून, यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर सविस्तर माहिती दिली आहे. वारसाहक्काची ही विभागणी वेळेतच करण्याच्या त्यांच्या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. विशेषतः संपत्तीत मुलीला मोठा वाटा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

पत्नीशी प्रदीर्घ चर्चा करून घेतला निर्णय

सिद्धू यांचे पतियाळातील यादविंद्र कॉलनीतील 'बाराबरी गार्डन' जवळ वडिलोपार्जित निवासस्थान आहे, तर अमृतसरमधील घर त्यांनी स्वतःच्या कमाईतून बांधले आहे. सिद्धू यांनी म्‍हटलं आहे की, "मी माझी पत्नी नवजोत हिच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर संपत्तीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला." हा निर्णय जाहीर करताना त्यांनी कुटुंबासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.

Navjot Sidhu property
Mohammed Shami |क्रिकेटपटू मोहम्‍मद शमीच्‍या पत्‍नीची सुप्रीम कोर्टात धाव, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी कोणती मागणी केली?

कोणाला काय मिळाले?

सिद्धू यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, मुलगा करण सिद्धू याच्या नावावर पतियाळा येथील सिद्धू यांचे वडिलोपार्जित घर करण्यात आले आहे. तर मुलगी राबिया सिद्धू हिला अमृतसर येथील सिद्धू यांनी स्वतः बांधलेले आलिशान घर देण्यात आले आहे.

Navjot Sidhu property
Pakistani cricketer divorce | "माझ्‍या घराची राखरांगोळी झाली ..." : घटस्फोटावर पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पत्नीने सोडले मौन

राजकारणातून काहीही कमावलेले नाही

"माझा ईश्वरावर विश्वास आहे. अमृतसरच्या जनतेने मला नेहमीच आदर दिला असून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मला अभिमान आहे की, मी माझ्या कष्टाची कमाई मुलांमध्ये वाटत आहे. मी राजकारणातून काहीही कमावलेले नाही," असे सिद्धू यांनी स्पष्ट केले आहे.

Navjot Sidhu property
Smriti Mandhana: स्मृती मानधनाने सोशल मीडियावरून लग्नाचे सर्व फोटो केले डिलीट, पलक मुच्छलची भावनिक पोस्ट

"मी स्थलांतरित पक्षी नाही"

सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये भावूक होत लिहिले की, "मी माता पार्वतीच्या आशीर्वादाने हे घर बांधले. अमृतसरला दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी मी हे केले. माझ्याबद्दल काही लोक म्हणायचे की, मी येथे एखाद्या स्थलांतरित पक्षासारखा आलो आहे आणि निघून जाईन. पण मी लोकांसाठी इथेच राहीन असा शब्द दिला होता. खासदार म्हणून दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही मी इथेच आहे." सिद्धू यांनी आपल्या कमाईचे स्रोतही स्पष्ट केले. 'बिग बॉस'पासून स्टार टीव्हीवरील हिंदी कॉमेंट्री आणि 'कपिल शर्मा शो'पर्यंतच्या कामातून त्यांनी पैसे कमावले. २०१४ मध्ये त्यांनी अमृतसरचे घर पूर्ण केले होते.

संघर्षातून सुखाच्या काळाकडे

गेली काही वर्षे सिद्धू कुटुंबासाठी आव्हानात्मक होती. एका जुन्या प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीला कॅन्सरचे निदान झाले. मात्र, आता कठीण काळ संपला आहे. मुलगा करणचा विवाह झाला असून त्यांच्या पत्नीनेही कॅन्सरवर यशस्वी मात केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news