

रांची (वृत्तसंस्था) : आयपीएल-2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खास झाली नाही. असे असले तरी कर्णधार धोनी (MS Dhoni) मात्र नेहमीच चर्चेत असतो. रांची विमानतळावर पोहोचल्यानंतर धोनीने आपल्या एका दिव्यांग चाहतीसोबत काही वेळ घालवून संस्मरणीय क्षणांचा अनुभव मिळवून दिला.
फॅन गर्ल लावण्याने धोनीसोबतच्या (MS Dhoni) क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यासोबत तिने सांगितले की, धोनीसोबतच्या भेटीवेळी मी अत्यंत भावुक झाले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. ते अश्रू धोनी याने स्वत: हाताने पुसून कधीच रडावयाचे नाही, असे सांगितले. लावण्याच्या पोस्टनुसार धोनी आणि तिची भेट 31 मे रोजी रांची विमानतळावर झाली आहे. या भेटीत धोनीने आपले स्केचही लावण्याला भेट म्हणून दिली. धोनीच्या भेटीबद्दल लावण्याने म्हटले की, या भेटीचा अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही. ते खरोखच दयाळू आणि गोड आहेत. त्याने माझ्या नावाचे स्पेलिंग विचारले आणि हातही मिळविला. हा क्षण माझ्या जीवनातील सर्वात आनंदी क्षण आहे.