MS Dhoni hookah video: 'जरा हुक्का पीके आता हूं...', धोनी आणि ऋषभ पंतचा पार्टीतील व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
MS Dhoni, Rishabh Pant
MS Dhoni, Rishabh PantFile Photo
Published on
Updated on

MS Dhoni hookah video:

नवी दिल्ली: भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही काही मित्रांसोबत एका खासगी पार्टीत दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये धोनीने 'हुक्का'बद्दल केलेले कथित विधान चर्चेचा मुख्य विषय ठरले आहे.

या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून प्रत्येकजण या क्लिपचे बारकाईने निरीक्षण करत आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता, तो कधीचा आणि कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

MS Dhoni, Rishabh Pant
Ajinkya Rahane On Dhoni Room: धोनीच्या रूमचा दरवाजा एकदा बंद झाल्यानंतर... रहाणेने कॅप्टन कूलबाबत वेगळाच गौप्यस्फोट केला?

व्हिडिओमध्ये नक्की काय आहे?

व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये ऋषभ पंत एका सोफ्यावर काही लोकांसोबत बसलेला दिसतो. हा माहौल एखाद्या हॉटेलच्या खोलीसारखा वाटत असून टेबलवर बिअरचे कॅन आणि कॉकटेल दिसत आहेत. त्यामुळे ही एक खासगी पार्टी असल्याचे स्पष्ट होते. याच दरम्यान पाठीमागे धोनी एका फोटोसाठी पोज देऊन परतताना आणि पंतशी हस्तांदोलन करताना दिसतो. याच वेळी धोनीच्या तोंडून "जरा हुक्का पीके आता हूं" हे वाक्य ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. धोनीचा हाच डायलॉग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

धोनी आणि हुक्क्याचे जुने कनेक्शन

या व्हिडिओमुळे धोनी आणि हुक्क्याशी संबंधित जुने किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली याने पूर्वी धोनीच्या या सवयीबद्दल खुलासा केला होता. बेलीच्या मते, धोनीला कधीकधी हुक्का प्यायला आवडायचे आणि तो अनेकदा आपल्या खोलीत ते सेट करायचा. धोनीच्या खोलीचे दरवाजे युवा खेळाडूंसाठी नेहमी उघडे असायचे, जिथे सगळे एकत्र येऊन वेळ घालवत असत. केवळ जॉर्ज बेलीच नाही, तर चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू मायकल हसी यानेही यापूर्वी धोनीच्या हॉटेलमधील खोलीतील वातावरणाबद्दल माहिती दिली होती. हसीने सांगितले होते की, धोनीची खोली अनेकदा खेळाडूंसाठी अनधिकृत टीम लाऊंजसारखी असायची, जिथे सर्व खेळाडू गप्पा मारण्यासाठी एकत्र जमायचे.

पंत आणि धोनीचे खास बॉन्डिंग

पंत आणि धोनी यांच्यात नेहमीच घट्ट नाते राहिले आहे. श्रीलंका मालिकेपूर्वी ऋषभ पंत जेव्हा रांचीमध्ये सराव करत होता, तेव्हाही धोनी त्याच्यासोबत दिसला होता. सराव सत्रानंतर धोनी स्वतः पंतला गाडीने सोडायला गेल्याचेही पाहिले गेले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान हे दोघे 'लॉर्ड्स'वर एकत्र दिसले होते.

MS Dhoni, Rishabh Pant
MS Dhoni Rishabh Pant workout: धोनीसोबत ऋषभ पंतचा कसून सराव; फोटो व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news