MS Dhoni: धोनी आज हैदराबादविरुद्ध खेळणार की नाही? अखेर सस्पेन्स संपला; समोर आली मोठी अपडेट!

IPL 2026 च्या हंगामात सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे महेंद्रसिंग धोनी मैदानात कधी परतणार?
IPL 2026 MS Dhoni
IPL 2026 MS Dhonifile photo
Published on
Updated on

MS Dhoni

नवी दिल्ली: आयपीएल २०२६ च्या हंगामात सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे महेंद्रसिंग धोनी मैदानात कधी परतणार? आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात धोनी खेळणार का, याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

नुकताच धोनी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला. यावेळी त्याने अत्यंत सहजतेने चेंडू सीमापार धाडले. चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर धोनीच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी, प्रत्यक्षात मैदानावर उतरण्यासाठी त्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

हैदराबादविरुद्ध खेळणार का?

धोनी आज सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे धोनी सध्या विश्रांती घेत आहे. त्याचा दोन आठवड्यांचा सराव आणि उपचारांचा कालावधी पूर्ण झाला असला, तरी संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसबाबत कोणतीही घाई किंवा जोखीम पत्करण्यास तयार नसल्याची माहिती मिळत आहे.

कधी करणार पुनरागमन?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीची प्रकृती सुधारत आहे. तो २३ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात किंवा २६ एप्रिल रोजी चेपॉकवर होणाऱ्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करू शकतो. आयपीएल सुरू होण्यापूर्वी सरावादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागले.

धोनी सध्या आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. २०२५ च्या लिलावापूर्वी चेन्नईने त्याला ४ कोटी रुपयांच्या 'अनकॅप्ड प्लेयर' श्रेणीत कायम राखले होते. आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आपला सलग तिसरा विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानावर विजयाची लय पकडण्यासाठी कंबर कसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news