IPL 2022 : लिलावात मोजले कोटी; नशिबी संधीची कोरी पाटी

IPL 2022 : लिलावात मोजले कोटी; नशिबी संधीची कोरी पाटी
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : यंदाचा आयपीएल (IPL 2022) हंगाम निम्मा संपला असला तरी कोट्यवधी रुपयांना विकत घेतलेल्या खेळाडूंना अद्याप संघात स्थान मिळालेले नाही. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाआधी झालेल्या मेगा लिलावात विविध संघांनी पाण्यासारखा पैसा ओतला. अनेक तारांकित खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले. मात्र, काही खेळाडूंना अद्याप मैदानात उतरायची संधी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रतिभावंत खेळाडू नशिबाला दोष देताना दिसत आहेत.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात राजस्थानकडून खेळणार्‍या चेतन साकरियाला यंदा दिल्लीने 4.2 कोटी रुपये मोजून खरेदी केले. 2021 मध्ये चेतन साकरियाने 14 बळी मिळवले होते. दिल्लीने अद्याप चेतनला संधी दिलेली नाही. त्याचप्रमाणे मागील दोन आयपीएल हंगामात आपल्या वेगाने आणि अचूक यॉर्करने प्रतिपक्षाला घायाळ करणार्‍या कार्तिक त्यागीलाही अद्याप संघात स्थान मिळाले नाही. हैदराबादने कार्तिकला चार कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. आतापर्यंत त्यागीला एकही सामना खेळण्यास मिळालेला नाही.

अंडर 19 संघाचा कर्णधार यश धूल याला दिल्लीकडून तर राजवर्धन हंगरगेकरला चेन्‍नईकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यांच्यावर कोट्यवधींची बोली लागली होती. आतापर्यंत त्यांना आयपीएलचा एकही सामना खेळायला मिळालेला नाही.

दिल्ली, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी कोट्यवधी रुपयांना विकत घेतलेल्या खेळाडूंना अजूनही अंतिम 11 मध्ये स्थान दिलेले नाही. दिल्लीने साकरियाखेरीज यष्टिरक्षक के.एस. भरतला संधी नाकारलेली आहे. हैदराबादने कार्तिक त्यागीलाच नव्हे तर न्यूझीलंडचा यष्टिरक्षक ग्लेन फिलिप्स यालाही बेंचवर बसवले आहे.

गुजरातने 1.10 कोटीमध्ये खरेदी केलेल्या वेस्ट इंडिजच्या डॉमनिक ड्रेक्स आणि 1.7 कोटीमध्ये खरेदी केलेल्या जयंत यादवला एकही संधी दिलेली नाही. हे कमी म्हणून की काय कोलकाताने 1 कोटी रुपये मोजून खरेदी केलेला अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीला अजून बेंचवर बसवण्यातच धन्यता मानली आहे.

संधी न मिळालेले कोट्यधीश खेळाडू (IPL 2022)

चेतन साकरिया (दिल्ली, 4.2 कोटी), कार्तिक त्यागी (हैदराबाद, 4 कोटी), के. एस. भरत (दिल्ली, 2 कोटी), जयंत यादव (गुजरात, 1.7 कोटी), ग्लेन फिलिप्स (हैदराबाद, 1.5 कोटी), राजवर्धन हंगरगेकर (चेन्‍नई, 1.5 कोटी) डॉमनिक ड्रेक्स (गुजरात, 1.7 कोटी) आणि मोहम्मद नबी (कोलकाता, 1 कोटी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news