Mohammed Siraj : प्लेईंग ११ वरून दोन राष्ट्रीय पक्ष भिडले... काँग्रेस खासदाराचे 'सिराज' नावाकडे बोट, भाजपकडून जडेजाचा उल्लेख

Mohammed Siraj NZ vs IND 1st Test Playing 11 :'मोहम्मद सिराज' नावामुळे प्लेईंग ११ मधून बाहेर... काँग्रेस खासदाराचा आरोप; भाजपचाही पलटवार
Mohammed Siraj
Mohammed Sirajpudhari
Published on: 
Updated on: 

Mohammed Siraj NZ vs IND 1st Test Playing 11 : 'भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली नाही यावरून आता देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप यांच्या शाब्दिक चकमक उडाली आहे.

काँग्रेस खासदारांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला टीमबाहेर ठेवण्यावरून प्रश्न विचारत त्याच्यासोबत भेदभाव होत असल्याचा आरोप केला. त्यावर आता भाजपने काँग्रेस क्रिकेटमध्ये देखील वोट बँकेचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते आता संघ निवडीला देखील धार्मिक रंग देत असल्याचा दावा केला.

Mohammed Siraj
KL Rahul NZ vs IND : केएल राहुलचं न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक अर्धशतक; भारताच्या कसोटी इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय

दुसरं कोणतं कारण असू शकतं...

काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी सिराजला संघात सामील का करण्यात आले नाही असा सवाल केला. त्याच्या धार्मिक ओळखीकडे इशारा करत सिराज चांगली कामगिरी करत आहे. तरी देखील त्याला टीम इंडियात स्थान देण्यात आलं नाही.

इम्रान मसूद म्हणाले, 'त्याचे नाव सिराज आहे. एवढं पुरेसं नाहीये का? जर तो चांगली कामगिरी करत असेल आणि तरी देखील त्याची निवड होत नसेल तर त्याचे दुसरे काय कारण असू शकते. एकच कारण असू शकतं त्याशिवाय दुसरं कोणतं कारण दिसत नाही.'

Mohammed Siraj
India vs New Zealand :वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली ! विराट आणि रोहितची न्यूझीलंडमधील अखेरची खेळीही ठरली अपयशी

काँग्रेसची लाज वाटते

यावर आता भाजपने देखील पलटवार केला असून भाजपने काँग्रेस आता क्रिकेट संघाच्या निवडीत देखील धार्मिक मुद्दे आणण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, 'काँग्रेसची लाज वाटते आता काँग्रेस क्रिकेट संघाच्या निवडीत देखील वोट बँकचे राजकारण आणत आहे. काँग्रेस म्हणत आहे की सिराज मुस्लिम असल्यानं त्याला संघाबाहेर ठेवलं जात आहे.siraj

Mohammed Siraj
Mohammed Siraj NZ vs IND: त्याने कधी भारताला निराश केलं नाही... सिराजची बाजू घेत सुनिल गावसकरांनी संघ व्यवस्थापनाला सुनावलं

भंडारी यांनी अष्टपैलू रविंद्र जडेजाला देखील संघाबाहेर ठेवल्याचा दाखला दिला. ते म्हणाले, 'प्रत्येक क्रिकेटपटू भारताचे प्रतिनिधित्व करणारी जर्सी घालतो. वोट बँक आणि धार्मिक राजकारणासाठी भारतीय क्रिकेट संघात फूट पाडणे बंद करा.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.