.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. सोशल मीडियावर मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा लग्नाच्या पोशाखातील फोटो समोर आल्यावर त्यांच्या लग्नाच्या अफवा सुरू झाल्या. (Mohammad Shami)
गेले काही दिवस क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मिडियावर सुरु आहेत. या चर्चांवर मोहम्मद शमीने मौन सोडत लग्नाचे वृत्त फेटाळून लावले आहे. शमीने शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर आपले मौन तोडले आहे.
या मुलाखतीत बोलताना शमी म्हणाला, "लोक अनेकदा अशा गोष्टी मीम्स म्हणून पाहतात, पण हा एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विषय आहे, हे पाहत नाहीत. त्यामुळे मिम्स बनवणाऱ्या लोकांनी ते विचारपूर्वक बनवावेत. ज्यांचे पेज व्हेरिफाय केलेले नाहीत ते लोक अशा गोष्टी बोलू शकतात. मी तुम्हाला आव्हान देतो की तुमच्यात जर हिम्मत असेल तर, व्हेरीफाईड अकाउंटवरुन असे मिम्स शेअर करुन दाखवा. Mohammad Shami
शमी मुलाखतीत बोलताना पुढे म्हणतो की, "दुसऱ्या व्यक्तीला खड्ड्यात ढकलणे सोपे आहे, पण त्या लोकांनी स्वत: यश मिळवण्याचा विचार केला पाहिजे. शमी पुढे म्हणाला, "इतरांचे पाय खेचण्यात या लोकांना जितकी मजा येते, तितकच मी त्यांना सांगू इच्छितो की, चार लोकांचे भविष्य बनुन त्यांच्या कुटुंबाचा आधार बनून सुधरा. जर त्यांनी इतर कोणाला मदत केली तर मी ते मान्य करेन. ते एक चांगला माणूस आहेत"
टेनिस स्टार सानिया मिर्झाने यावर्षी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला घटस्फोट दिला होता. मोहम्मद शमीसोबतच्या तिच्या लग्नाच्या अफवा पसरू लागल्यावर सानियाच्या वडिलांचे वक्तव्य समोर आले. सानियाच्या वडिलांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावले आहे.