Manchester City : चेल्सीला नमवत मँचेस्टर सिटीने उंचावला ‌‘एफए कप‌’, 72 व्या मिनिटाला सेमेन्योचा निर्णायक गोल

Manchester City : चेल्सीला नमवत मँचेस्टर सिटीने उंचावला ‌‘एफए कप‌’, 72 व्या मिनिटाला सेमेन्योचा निर्णायक गोल
Published on
Updated on

लंडन : ‌‘एफए कप‌’ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीने चेल्सीचा 1-0 असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सामन्याच्या 72 व्या मिनिटाला अँटोइन सेमेन्योने केलेल्या उत्कृष्ट मैदानी गोलच्या जोरावर मँचेस्टर सिटीने यंदाच्या हंगामातील ‌‘इंग्लिश कप‌’चे दुहेरी जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला.

घानाचा स्टार खेळाडू सेमेन्योने एर्लिंग हालांडने दिलेल्या पासवर चपळाईने वळत चेल्सीचा गोलरक्षक रॉबर्ट सांचेझ याला चकवून चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. या गोलमुळे संथ गतीने चाललेल्या सामन्यात कमालीचा थरार निर्माण झाला. सामन्याच्या अंतिम 20 मिनिटांत दोन्ही संघांना गोल करण्याच्या उत्तम संधी मिळाल्या. मँचेस्टर सिटीच्या रायन चेर्कीने मारलेला शानदार फटका सांचेझने अडवला, तर मॅथ्यूस नुनेसचा शॉट गोलपोस्टच्या खांबाला लागून परतला.

चालू हंगामानंतर क्लब सोडणार असलेला ‘मँचेस्टर सिटीचा कर्णधार बर्नार्डो सिल्व्हा याने या विजयाचे वर्णन ‌‘अत्यंत विशेष‌’ असे केले. पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा मँचेस्टर सिटीचा संघ प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या अर्सेनलपेक्षा केवळ दोन गुणांनी मागे असून हंगामातील केवळ दोन सामने शिल्लक आहेत. मँचेस्टर सिटीचे हे आठवे ‌‘एफए कप‌’ विजेतेपद ठरले असून, यापूर्वी त्यांनी मार्च महिन्यात ‌‘लीग कप‌’देखील जिंकला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news