Manav Suthar IND vs AFG: मानव सुथारचा पदार्पणातच धमाका; ठरला 'या' शतकातला दुसराच गोलंदाज... अफगाणिस्तानला फॉलो ऑन

Manav Suthar IND vs AFG
Manav Suthar IND vs AFGpudhari
Published on
Updated on

Manav Suthar IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी समन्यात भारताने मजबूत पकड निर्माण केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने अफगाणिस्तानचा पहिला डाव १५२ धावात गुंडाळत फॉलो ऑन दिली. भारताकडून पदार्पण करणाऱ्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाज मानव सुथारने मोठा धमाका केला. त्याने ३३ धावा देत ६ विकेट्स मिळवल्या.

याचबरोबर त्याने अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले आहेत. तो भारतीय क्रिकेट विश्वातील पदार्पणात पंजा खोलणारा या शतकातील दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच भारताकडून पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

राजस्थानकडून खेळणाऱ्या डावखुऱ्या मानव सुथारने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात ३३ धावा देत तब्बल ६ विकेट्स घेतल्या आहेत. तो भारताकडून कसोटी पदार्पणाच्या सामन्यात ५ विकेट्स घेणारा या शतकातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी २००८ मध्ये अमित मिश्राने आपल्या पदार्पणाच्या कसोटीत ७१ धावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने ही कामगिरी ऑस्ट्रेलियाविरूद्ध केली होती.

दरम्यान, मानव सुथारने अजून एक विक्रम आपल्या नावावर केला. तो आता भारताकडून कसोटी पदार्पणात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर नरेंद्र हिरवाणी यांचा नंबर लागतो. त्यांनी १९८८ मध्ये वेस्ट इंडीजविरूद्ध ६१ धावात ८ विकेट्स घेतल्या होत्या.

पदार्पणाच्या कसोटीत दमदार कामगिरी करणारे भारतीय गोलंदाज

नरेंद्र हिरवाणी - ६१ धावात ८ विकेट्स (वेस्ट इंडीज)

मानव सुथार - ३३ धावात ६ विकेट्स (अफगाणिस्तान)

अबिद अली- ५५ धावात ६ विकेट्स (ऑस्ट्रेलिया)

दिलीप जोशी - १०३ धावात ६ विकेट्स (ऑस्ट्रेलिया)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news