

नागपूर: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष अरुण लखानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्यासोबतच छत्रपती संभाजीनगरचे शिरीष बोराळकर यांची कार्याध्यक्षपदी, मंगेश काशीकर यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी तर अनुभवी संघटक सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई शहरचे सचिन भारती नवे संयुक्त सचिव म्हणून निवडून आले.
२०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या कार्यकारिणी निवडणुकीत सर्वच पदांसाठी प्रत्येकी एकच वैध अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.
वरिष्ठ उपाध्यक्षपदी नागपूरचे मंगेश विजय काशीकर यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी वृषालीराजे भोसले (सातारा), पंकज ठाकूर (पालघर), ओंकार हजारे (रत्नागिरी), परेश ठाकूर (रायगड), जोवेल चांदेकर (चंद्रपूर) आणि विजय पळसकर (बुलढाणा) निवडून आले.
तसेच स्पर्धा सचिवपदी प्रसाद गोखले (पालघर), सी. अँड डी. सचिवपदी आनंद जोशी (पुणे), मानद कोषाध्यक्षपदी जगदीश जोशी (नागपूर) आणि मानद सहसचिवपदी सचिन भारती (जीएमबीए) यांची बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय ११ सदस्यीय नियामक मंडळात (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन कार्यकारिणी
अध्यक्ष - अरुण लखानी (नागपूर), कार्याध्यक्ष - शिरीष बोराळकर (छत्रपती संभाजीनगर), वरिष्ठ उपाध्यक्ष - मंगेश काशीकर (नागपूर), मानद सरचिटणीस - सिद्धार्थ पाटील (छत्रपती संभाजीनगर), उपाध्यक्ष - वृषालीराजे शिवाजीराजे भोसले (सातारा), पंकज ठाकूर (पालघर), ओंकार हजारे (रत्नागिरी), परेश ठाकूर (रायगड), जोवेल चांदेकर (चंद्रपूर), विजय पळसकर (बुलढाणा). सचिव व कोषाध्यक्ष - मानद स्पर्धा सचिव - प्रसाद गोखले (पालघर), मानद प्रशिक्षण व विकास सचिव - आनंद जोशी (पुणे), मानद कोषाध्यक्ष - जगदीश जोशी (नागपूर), मानद सहसचिव - सचिन भारती.
नियामक मंडळ सदस्य - महेश वाक्रडकर (नांदेड), पराग एकंडे (नाशिक), मिलिंद कुलकर्णी (अहिल्यानगर), दिनेश पाटील (धुळे), समीर पाटणकर (बामू), विनीत जोशी (जळगाव), नागोजी चिलकरवार (जालना), दिनेश धूत (अकोला), साईदास खानगव (कोल्हापूर), स्नेहा विंदा फैजपूरकर (नागपूर), मुकेश नागपुरे (गडचिरोली).