Lionel Messi : वडिलांच्या निधनानंतर लिओनेल मेस्सीचा फुटबॉलमधून 'ब्रेक'; मैदानात परतण्याची तारीख अस्पष्ट

हॉर्हे मेस्सी होते लिओनेल च्या फुटबॉल कारकिर्दीचे मुख्य शिल्पकार
Lionel Messi
Lionel MessiFile Photo
Published on
Updated on

Lionel Messi Break Football : वडिलांच्या निधनानंतर अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. स्पॅनिश वृत्तपत्र 'मार्का'ने (Marca) दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी वडील हॉर्हे मेस्सी (Jorge Messi) यांचे निधन झाल्यानंतर मेस्सी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी या आठवड्यात अर्जेंटिनाला रवाना झाला आहे.

'इंटर मियामी'मध्ये परतण्याची तारीख अनिश्चित

इंटर मियामीचा (Inter Miami) कर्णधार असलेल्या मेस्सीच्या अमेरिकेत परतण्याबाबत कोणतीही निश्चित वेळ किंवा तारीख अद्याप ठरलेली नाही. 'लीग्स कप'मधील मोंटेरीविरुद्धच्या (Monterrey) सामन्याची तयारी करत असताना मेस्सीला दक्षिण फ्लोरिडामध्ये असताना वडिलांच्या निधनाची दुःखाद बातमी मिळाली. ६८ वर्षीय हॉर्हे मेस्सी यांचे रोझारियो येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मेस्सीसाठी हा अत्यंत मोठा वैयक्तिक धक्का मानला जात आहे. अर्जेंटिनामधील माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मेस्सीने या कठीण काळात कुटुंबासोबत राहण्यासाठी आपल्या सर्व व्यावसायिक कमिटमेंट्स थांबवल्या आहेत. सध्याच्या त्याच्या 'इंटर मियामी' (Inter Miami) क्लबमध्ये तो कधी परतणार, याची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. इंटर मियामी क्लबने मेस्सीला पूर्ण पाठिंबा दर्शवत अनिश्चित काळाची सुट्टी मंजूर केली आहे. मेस्सीला जितका वेळ कुटुंबासोबत घालवणे आवश्यक वाटेल, तितका वेळ तो अर्जेंटिनामध्ये राहू शकतो, असे क्लब व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

Lionel Messi
Dhruv Rathee video case : ध्रुव राठीचा 'राम-कृष्ण' संदर्भातील वादग्रस्त व्हिडिओ भारतात ब्लॉक; Googleची हायकोर्टात माहिती

कारकिर्दीचा मुख्य आधारवड हरपला

विश्वचषक विजेत्या मेस्सीसाठी वडील हॉर्हे यांचे निधन हा अत्यंत मोठा वैयक्तिक धक्का आहे. हॉर्हे मेस्सी हे केवळ लिओनेलचे वडील नव्हते, तर त्याच्या संपूर्ण फुटबॉल कारकिर्दीचे मुख्य शिल्पकार होते. एका स्टील कारखान्यात सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या हॉर्हे यांनी मेस्सीच्या बालपणापासून ते जागतिक फुटबॉलच्या शिखरावर पोहोचेपर्यंत त्याचे मुख्य मॅनेजर, प्रतिनिधी आणि सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.मेस्सी नुकताच दुखापतीतून सावरून सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला होता. 'लीग्स कप'मध्ये अ‍ॅटलेटिको सॅन लुईस विरुद्धच्या सामन्यात त्याने दोन गोल करत चमकदार कामगिरी केली होती; मात्र आता त्याच्या क्रीडा कारकिर्दीतील सर्व महत्त्वाच्या गोष्टींना पूर्णविराम मिळाला आहे.

कठीण काळात दिली साथ

लहानपणी मेस्सीला ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेचा आजार होता. याचा त्याच्या शारीरिक वाढीवर परिणाम होत होता. बार्सिलोना क्लबने या उपचारांचा खर्च उचलला. दररोज इंजेक्शन घ्यावे लागणाऱ्या या कठीण उपचारांमधून जात मेस्सीने १.७० मीटर उंची गाठली आणि जगातील महान खेळाडू बनला. या संपूर्ण प्रवासात हॉर्हे यांनी त्याला मोलाची साथ दिली.

Lionel Messi
JPSC Scam News : १३ वर्षांत १२ परीक्षा पास ! TDPL मॅनेजरच्‍या अटकेने उघडकीस आले JPSC भरती घोटाळ्याचे 'मोठा रॅकेट'!

१,००० गोलचा टप्पा गाठण्यासाठी केवळ ७९ गोलची गरज

२०२३ मध्ये 'इंटर मियामी'मध्ये समाविष्ट झाल्यापासून मेस्सीने 'मेजर लीग सॉकर' (MLS), 'कॉनकॅफ' (Concacaf) आणि इतर स्पर्धा मिळून १०७ सामन्यांमध्ये ९२ गोल केले आहेत. दर ९६.२ मिनिटांना एक गोल अशा सरासरीने तो कामगिरी करत होता. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील एकूण गोल संख्या ९२१ झाली असून, १,००० गोलचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आता केवळ ७९ गोलची गरज आहे.मात्र, सध्याच्या परिस्थितीत ही सर्व आकडेवारी दुय्यम ठरली आहे. मेस्सी सध्या रोझारियोमध्ये आपल्या कुटुंबासोबत असून, तो मैदानात कधी पुनरागमन करणार हे पूर्णपणे त्याच्या मानसिक तयारीवर आणि इच्छेवर अवलंबून असेल. हॉर्हे मेस्सी यांच्या पश्चात पत्नी सेलिया कुचिटिनी आणि लिओनेल, रोड्रिगो, मथियास व मारिया सॉल ही मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news