JPSC Scam News : १३ वर्षांत १२ परीक्षा पास ! TDPL मॅनेजरच्‍या अटकेने उघडकीस आले JPSC भरती घोटाळ्याचे 'मोठा रॅकेट'!

ब्लॉकमध्ये पुरवठा अधिकारी असणार्‍या अभय तिवारीच्‍या अटकेनंतर संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोर उलगडले
झारखंड लोकसेवा आयोग कथित गैरव्यवहार प्रकरणी घोटाळ्या सूत्रधार अभय तिवारीने पोलीस चौकशीत अनेक धक्‍कादायक खुलासे केले आहेत.
झारखंड लोकसेवा आयोग कथित गैरव्यवहार प्रकरणी घोटाळ्या सूत्रधार अभय तिवारीने पोलीस चौकशीत अनेक धक्‍कादायक खुलासे केले आहेत.
Published on
Updated on

JPSC Recruitment Scam : झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि गुणवत्ता घोटाळ्यात नाव समोर आलेल्या अभय कुमार तिवारी उर्फ मनोज कुमार तिवारीची कहाणी सध्या झारखंड चर्चेचा विषय ठरली आहे. गोड्डा जिल्ह्यातील पोडैयाहाट ब्लॉकमध्ये पुरवठा अधिकारी (BSO) पदावर कार्यरत असलेल्या अभय तिवारीला CID ने जुलै 2026 मध्ये अटक केली होती. आता त्याच्या चौकशीतून समोर येणाऱ्या धक्कादायक माहितीमुळे या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोर उलगडत आहेत.

कोण आहे मास्टरमाइंड अभय तिवारी?

सरकारी कागदपत्रांमध्ये अभय नावाने ओळखला जाणारा हा आरोपी, TSR डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड (TDPL) मध्ये मनोज कुमार तिवारी नावाने मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत होता. सरकारी नोकरी मिळण्यापूर्वी तो याच एजन्सीशी जोडलेला होता. लखनऊस्थित ही कंपनी झारखंडमध्ये JPSC आणि JSSC च्या अनेक परीक्षांचे संचालन करत असे. या कंपनीला उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात आले आहे.

झारखंड लोकसेवा आयोग कथित गैरव्यवहार प्रकरणी घोटाळ्या सूत्रधार अभय तिवारीने पोलीस चौकशीत अनेक धक्‍कादायक खुलासे केले आहेत.
Former JPSC Chairman Arrested : विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडाल्‍यानंतर झारखंड सरकारची मोठी कारवाई; JPSC माजी अध्यक्षांना अटक

13 वर्षांत तब्बल 12 स्पर्धा परीक्षा पास

CID च्या माहितीनुसार, अभय तिवारीने गेल्या 13 वर्षांत तब्बल 12 स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. यामध्‍ये, सब-इन्स्पेक्टर (पोलिस) परीक्षा आणि भारतीय नौदल भरती, भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) आणि CRPF हेड कॉन्स्टेबल, नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड, JSSC चे PGT आणि CGL, JPSC चे ACF, FRO, FSO आणि नागरी सेवा पूर्व परीक्षा आदींचा समावेश आहे. या असाधारण यशाकडे आता तपास यंत्रणा संशयास्पद गैरव्यवहार म्हणून पाहत आहेत.

नातेवाईकांनी मिळवून दिल्‍या सरकारी नोकऱ्या

तपासात असेही समोर आले आहे की अभय तिवारीचा भाऊ अक्षय तिवारी आणि त्याच्या पत्नीलाही JSSC CGL सारख्या परीक्षांद्वारे सरकारी नोकरी मिळाली. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नियुक्त्यांचीही सध्या चौकशी सुरू आहे. स्वतःसह संपूर्ण कुटुंबासाठी परीक्षा पद्धतीतील त्रुटी आणि गैरव्यवहाराचा फायदा घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

एका उमेदवाराकडून उकळायचा २५ ते ४० लाख रुपये

२२ जुलै २०२६ रोजी CID च्या पथकाने अभय तिवारीला पोडैयाहाट येथून ताब्यात घेतले. त्याच्या भाड्याच्या घरातून सुमारे ५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. अटकेनंतर त्याला सखोल चौकशीसाठी रांची येथे आणण्यात आले.आपल्या परीक्षांमधील यशाचा दाखला देऊन तो उमेदवारांचा विश्वास संपादन करायचा आणि थेट निवडीची हमी देऊन २५ ते ४० लाख रुपये उकळायचा. काही प्रकरणांमध्ये ही रक्कम याहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

झारखंड लोकसेवा आयोग कथित गैरव्यवहार प्रकरणी घोटाळ्या सूत्रधार अभय तिवारीने पोलीस चौकशीत अनेक धक्‍कादायक खुलासे केले आहेत.
Jharkhand Student Protest : झारखंड सरकारने CGL परीक्षा रद्दची मागणी फेटाळली : विद्यार्थ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

CID चौकशीत खळबळजनक खुलासे

  • पोलीस चौकशीदरम्यान अभय तिवारीने एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. JPSC परीक्षांमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी ठरलेले दर खालीलप्रमाणे होते:

  • पूर्व परीक्षा (Prelims): खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ५ लाख रुपये, तर राखीव प्रवर्गाकडून २ ते ३ लाख रुपये.

  • अंतिम निवड (Final Selection): प्रति उमेदवार ६० ते ७० लाख रुपये.

  • मुलाखत (Interview): गुण वाढवण्यासाठी प्रति उमेदवार १५ लाख रुपये.

  • परीक्षा संचालनाचे कंत्राटसाठी मोजले २ कोटी रुपये

परीक्षा संचालनाचे कंत्राटसाठी मोजले २ कोटी रुपये

TDPL ला परीक्षा संचालनाचे कंत्राट मिळवून देण्यासाठी माजी अध्यक्षांसोबत २ कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता, असा दावा तिवारीने केला आहे. तसेच एजन्सीला मिळणाऱ्या प्रत्येक बिलावर २० टक्के कमिशन देण्याची अट होती. स्वतःच्या यशाचे दाखले देऊन तिवारी उमेदवारांना जाळ्यात ओढत असे. पैसे उकळल्यानंतर परीक्षा प्रक्रियेत छेडछाड करणे. OMR सीट बदलणे, उत्तरपत्रिका (Answer Keys) लीक करणे आणि मुलाखतीत बेकायदेशीरपणे गुण वाढवल्‍याचा दावा केला जात होता.

झारखंड लोकसेवा आयोग कथित गैरव्यवहार प्रकरणी घोटाळ्या सूत्रधार अभय तिवारीने पोलीस चौकशीत अनेक धक्‍कादायक खुलासे केले आहेत.
Supreme Court : पैसे अपूर्ण मिळाले म्हणून 'खरेदीखत' अवैध ठरत नाही! सर्वोच्‍च न्‍यायालयाचा मालमत्ता हस्तांतरणावर मोठा निर्णय

विद्यार्थी संघटनांची सीबीआय चौकशीची मागणी

अभय तिवारी सध्या CID च्या कोठडीत असून त्याच्या जबाबानंतर पुढील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. JPSC च्या माजी अध्यक्षांसह अनेक सदस्यांनी आधीच राजीनामे दिले आहेत. दरम्यान, विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांनी या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news