Jaspal Rana Death: राणांना 3 दिवसांपासून त्रास, मिळणार होता डिस्चार्ज.. मात्र अचानक झाला मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

Jaspal Rana Death
Jaspal Rana Deathpudhari
Published on
Updated on

Jaspal Rana Death Reason: भारताचे दिग्गज शूटर आणि कोच जसपाल राणा यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. ते अवघ्या ४९ वर्षाचे होते त्यामुळं त्यांच्या निधानामुळं सर्वांनाच धक्का बसला. ते सध्या मनू भाकरला प्रशिक्षण देत होते.

जसपाल राणा हे म्युनिचमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ISSF विश्वचषख स्पर्धेतून भारतीयसंघासोबत मायदेशात परतत होते. प्रवासादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. दिल्ली विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांची प्रकृती अजूनच बिघडली. त्यांना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आलं. साकेत रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Jaspal Rana Death
Chhatrapati Sambhajinagar teacher death : जनगणनेच्या ड्यूटीवरील शिक्षकाचा उष्माघाताने मृत्यू

गंभीर अवस्थेत रूग्णालयात पोहचले

जसापल राणा यांच्या मृत्यूनंतर साकेत रूग्णालयाचे ग्रुप चेअरमन डॉक्टर बलबीर सिंह यांनी जसपाल राणांबाबत नेमकं काय झालं याची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले, 'शूटर जसपाल राणा हे तीन दिवसांपूर्वी आमच्या रूग्णालात अॅक्युट हार्ट अटॅक आल्यानं आले होते. ते रूग्णालयात येण्यापूर्वी सतत प्रवास करत होते आणि त्यांना सतत छातीत दुखत होतं. ते ज्यावेळी रूग्णालयात आले त्यावेळी ते गंभीर स्थितीत होते.'

Jaspal Rana Death
Jaspal Rana Passes Away: भारताचा स्टार शूटर हरपला! जसपाल राणा यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन; क्रीडा विश्वात शोककळा

धमण्या होत्या ब्लॉक

डॉक्टर पुढे म्हणाले, 'त्यांना त्याच्या धमण्यांमुळे हा हार्ट अटॅक आला होता. त्या पूर्णपणे ब्लॉक झाल्या होत्या. तपासात त्यांच्या ह्रदयाची पंपिंग क्षमता खूपच कमी झाली अशल्याचं आढळून आलं. त्यांचे ह्रदय जवळपास निकामी झाले होते. जे रूग्ण हार्ट अटॅकनंतर खूप उशीराने रूग्णालयात येतात त्यांना गंभीर कॉम्प्लिकेशनचा सामना करावा लागतो. त्यात कार्डिएक रप्चरचा देखील समावेश असतो. अशा परिस्थितीत त्यांचा अचानक मृत्यू होऊ शकतो.'

Jaspal Rana Death
Maharashtra Teachers Census Duty: 42 अंश तापमानात शिक्षकांकडून जनगणना; ‘जुलैनंतरच मोहीम घ्या’ची मागणी

उपचाराना चांगला प्रतिसाद मात्र अचानक...

उपचारांना राणा कसे प्रतिसाद देत होते याबाबत सांगतना डॉक्टर म्हणाले, 'राणा यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत होती. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होता. मात्र दुर्दैवाने त्यांना झोपत असताना अचानक कार्डिएक रप्चरचा सामना करावा लागला. त्यातच त्यांचे निधन झाले.'

जसपाल राणा यांनी शूटिंगमध्ये पिस्तुल प्रकारात भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. त्यांनी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवल्यानंतर जसपाल राणा यांनी कोच म्हणून देखील आपलं योगदान दिलं. ते भारतीय पिस्तूल नेमबाजांच्या हाय-परफॉर्मन्स कोच म्हणून कार्यरत होते. मनू भाकर सारख्या अनेक उद्योन्मुख खेळाडूंनी त्यांनी मार्गदर्शन केलं होतं.

logo
Pudhari News
pudhari.news