Jaspal Rana Passes Away: भारताचा स्टार शूटर हरपला! जसपाल राणा यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन; क्रीडा विश्वात शोककळा

Jaspal Rana Passes Away: भारतीय नेमबाजी क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले.
Jaspal Rana Passes Away
Jaspal Rana Passes AwayPudhari
Published on
Updated on

Jaspal Rana Passes Away: भारताचे माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचे शुक्रवारी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वात शोककळा पसरली असून अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जसपाल राणा जर्मनीतील म्यूनिख येथे झालेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघासोबत भारतात परतत होते. प्रवासादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जसपाल राणा हे भारतीय नेमबाजीतील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली खेळाडूंपैकी एक मानले जात होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत पदके जिंकली. विशेषतः पिस्तूल नेमबाजी प्रकारात त्यांनी देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले होते.

Jaspal Rana Passes Away
FIFA World Cup Gilberto Mora: कोण आहे हा गिलबर्टो मोरा? १७ वर्षीय फुटबॉलपटूने फिफा विश्वचषकात ९६ वर्षांचा विक्रम मोडला!

खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. भारतीय नेमबाजी संघातील नवोदित आणि उदयोन्मुख खेळाडूंना घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सध्या ते भारतीय पिस्तूल नेमबाजांच्या हाय-परफॉर्मन्स कोच म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा नेमबाजांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले.

Jaspal Rana Passes Away
Stock Market Rally: ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने बाजारात खळबळ; सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स तेजीत?

त्यांच्या निधनाची माहिती भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना (NRAI) यांनी दिली आहे. जसपाल राणा यांच्या अचानक जाण्याने भारतीय क्रीडा क्षेत्राने एक अनुभवी मार्गदर्शक, उत्कृष्ट नेमबाज आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या स्मृतींना भारतीय क्रीडा विश्वाकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news