

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. अथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही आनंदाची बातमी शेअर करत लिहिले की, ‘आम्ही एका मुलीचे पालक झालो आहोत.’ शेट्टी आणि राहुल कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
या आनंदाच्या घटनेमुळे केएल राहुलने आयपीएल 2025 मधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लखनौ सुपर जायंट्स सामन्यातून माघार घेतली. तो रविवारी विशाखापट्टनममधून मुंबईला परतला.
अथिया आणि केएल राहुल यांनी जानेवारी 2023 मध्ये विवाह केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी जन्मलेल्या नवजात मुलीच्या आगमनाने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.