KKR vs LSG | कोलकात्यात लखनौच ‘नवाब’; नवोदित मुकुल चौधरीचा केकेआरला दे धक्का

KKR vs LSG |
मुकुल चौधरी
Published on
Updated on

कोलकाता; वृत्तसंस्था : मुकुल चौधरीने 27 चेंडूंत 2 चौकार, 7 उत्तुंग षटकारांसह 54 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी साकारल्यानंतर लखनौ सुपर जायंटस्ने घरच्या मैदानावर खेळणार्‍या केकेआर संघाला 3 गडी राखून निसटती मात दिली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीने लढवल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने 4 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली तर लखनौने 20 षटकांत 7 बाद 182 धावांसह दणकेबाज विजय मिळवला.

विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची आवश्यकता असताना अवेश खानने एकेरी धाव घेत मुकेशकडे स्ट्राईक सोपवला आणि मुकेशने दोन षटकार खेचत सामना बरोबरीत आणला. शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव आवश्यक असताना मुकेशला फटका मारता आला नव्हता. पण, चेंडू यष्टीमागे गेल्यानंतर एकेरी धाव धावून पूर्ण केल्यानंतर या बाय धावेसह लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

प्रारंभी, लखनौने आपल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर केकेआरला 181 धावांवर रोखले. मधल्या षटकांत लखनौच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी मार्‍यामुळे कोलकात्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात अडखळत झाली. फिन अ‍ॅलन (9) सलग दुसर्‍यांदा स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फॉर्मात असलेल्या अंगक्रीश रघुवंशीने डावाची सूत्रे हाती घेतली. या जोडीने 52 चेंडूंत 84 धावांची वेगवान भागीदारी केली. 10 षटकांत 1 बाद 98 धावा अशा सुस्थितीत असलेल्या कोलकात्याला ही जोडी 200 पार नेईल, असे वाटत होते. मात्र, 11 ते 14 या षटकांच्या दरम्यान लखनौच्या फिरकी आणि अचूक वेगवान मार्‍याने सामन्याचे चित्र पालटले.

अजिंक्य रहाणे, अंगक्रीश रघुवंशी व रिंकू सिंग बाद झाल्याने या तीन विकेटस्मुळे कोलकात्याची धावसंख्या 15 षटकांत 4 बाद 115 अशी झाली. मधल्या काळात तब्बल 30 चेंडू एकही चौकार बसला नाही. यामुळे केकेआरचा डाव थंडावला. अखेरच्या षटकांत रोव्हमन पॉवेल (24 चेंडूंत नाबाद 39) आणि कॅमेरून ग्रीन (24 चेंडूंत नाबाद 32) यांनी फटकेबाजी करत संघाला 181 पर्यंत पोहोचवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news