बुमराहने करुण नायरशी वाद का घातला? हिटमॅन रोहितच्या प्रतिक्रियेचा Video व्हायरल

Bumrah vs Karun Nair : नायरकडून बुमराहची धुलाई
jasprit bumrah vs karun nair fight
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग 2025 मधील दिल्ली कॅपिटल्सची विजय मालिका रविवारी (दि. 13) संपुष्टात आली. मुंबई इंडियन्सने अक्षर पटेलच्या संघाला त्यांच्या घरच्या अरुण जेटली स्टेडियमवर फक्त 12 धावांनी पराभूत केले. दिल्लीचा हा स्पर्धेतील सलग चार विजयानंतरचा पहिला पराभव आहे. या रोमांचक सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सकडून इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरलेल्या करुण नायरने 40 चेंडूंमध्ये 89 धावांची शानदार खेळी खेळून चाहत्यांची मने जिंकली. त्याने जसप्रीत बुमराहची चांगलीच धुलाई करत त्याच्या एका षटकात 18 धावा कुटल्या. (Jasprit Bumrah vs Karun Nair fight IPL 2025, DC vs MI)

या सामन्यात नायरने फक्त 22 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्याने बुमराहच्या 9 चेंडूंचा सामना करत 26 धावा वसूल केल्या. मात्र नंतर दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली आणि वाद रंगला.

नायरने बुमराहला फोडला घाम

ही घटना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीदरम्यानच्या सहाव्या षटकातील आहे. करुणने नायरने बुमराहच्या चेंडूवर दोन षटकार आणि एक चौकार मारला. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसरी धाव घेताना नायर बुमराहला आदळला. यानंतर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज संतापला.

नायरकडून चूक मान्य, पण...

नायरने लगेच आपली चूक मान्य केली. त्याने टक्कर झाल्यानंतर आणि अर्धशतक साजरे करताना माफी मागितली. पण बुमराह शांत झाला नाही. टाइमआउट दरम्यान बुमराह नायरजवळ गेला आणि दिल्लीच्या फलंदाजाला उद्देशून काहीतरी टिप्पणी केली. नायरनेही जोरदार प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दोघांमध्ये वाद रंगला.

हार्दिक पंड्याची मध्यस्थी

हे प्रकरण तापणार असे दिसताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने तत्काळ मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. या सगळ्या गोंधळादरम्यान रोहित शर्मा त्याच्या हटके शैलीत प्रतिक्रिया देताना दिसला. त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅमेरामनने हिटमॅनवर फोकस केला, तेव्हा तो हा वाद डोके हलवत एन्जॉय करत असल्याचे पहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news