Jason Gillespie PCB Dues: पाक क्रिकेट बोर्डाने अजून पैसे दिले नाहीत... गिलेस्पीचा गौप्यस्फोट, म्हणाला तत्वांशी तडजोड नाही

Jason Gillespie PCB Dues
Jason Gillespie PCB Duespudhari
Published on
Updated on

Jason Gillespie PCB Dues: पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या वादळ उठलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाचा इंग्लंड दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर खेळाडूंना परत मायदेशी बोलवलं होतं. तिसऱ्या कसोटीपूर्वी मुख्य कोच सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे.

आता या घडामोडीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि पाकिस्तानचा माजी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीचे वक्तव्य चर्चेत आले आहे. त्याने पीसीबीच्या या निर्णयाचे कोणतेही आश्चर्य वाटले नसल्याचे सांगितले. गिलेस्पीच्या मते उमर गुलला आश्चर्यकारक कारणांसाठी पद सोडावं लागलं आहे. त्याने पहिली कसोटी हरल्यानंतर वेगवान गोलंदाजांच्या अपयशाला हवामान दोषी असल्याचं सांगितलं होतं.

Jason Gillespie PCB Dues
Cricket Controversy : ‘रोज कपडे बदलावेत तशा योजना बदलतात’; गिलेस्पीने पाकिस्तान क्रिकेटची अब्रू वेशीवर टांगली

गिलेस्पी ८ महिने होता पाकिस्तानचा कोच

जेसन गिलेस्पी हा पाकिस्तान कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक राहिला आहे. त्याने २०२४ मध्ये आठ महिन्यांसाठी ही जबाबदारी सांभाळली होती. गिलेस्पी फास्ट बॉलिंग कार्टेल पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की उमर मला एखादा जादूई क्लुप्ती सांग, तु आता बॉलिंग कोच नाहीयेस याचं मला आश्चर्य वाटत नाही.'

माजी वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला की, 'इथं सगळं अराजक आहे. खेळाडूंना या गोष्टीची सवय आहे. सात खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणे त्यानंतर इंग्लंडच्या राजाला भेटण्यासाठी थांबण्यास सांगणं.... पीसीबीला काहीच खेळाडूंना किंगला भेटायला जायला सांगणं लाजीरवाणं वाटत होते. तुम्ही तुमच्या लोकांसोबत असं कसं करू शकता. याला काही अर्थ नाहीये.

Jason Gillespie PCB Dues
Jason Holder catch controversy: जेसन होल्डरचा वादग्रस्त कॅच.. विराटचा दंगा; रजत पाटीदार आऊट होता की नव्हता; नियम काय सांगतो?

पीसीबीने अजून माझे पैसे दिले नाहीत

गिलेस्पीने एक मोठा गौप्यस्फोट केला. त्याने पीसीबीवर माझे अजून उधार असल्याचे सांगितले. द टेलिग्राफला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, 'आकिब जावेद यांची नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण चित्र बदललं होतं. त्यानंतरच पाकिस्तान क्रिकेटशी असलेलं माझं नातं पूर्णपणे बदललं. ज्यावेळी आकिब आले त्यावेळी असं वाटलं की ते पूर्णपणे इनचार्ज आहेत.

Jason Gillespie PCB Dues
PCB CET Result 2026: पीसीबी सीईटी निकाल जाहीर; ११ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल, विद्यार्थिनींचीही चमक

गिलेस्पी पुढे म्हणाला की माझे पीसीबीकडे अजूनही हजारो डॉलर्स उधार आहेत. मात्र मी कधीही माझ्या तत्वांशी तडजोड करणार नाही. मी कधीही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी केल्या नाहीत. मी कधी माझ्या तत्वांशी तडजोड केलेली नाही. संपूर्ण कारकिर्दीत मी कधी असं केलं नाही. मी गप्प बसून पगार घेऊन घरी येऊ शकत होतो. मात्र मी असा नाहीये. मला मनातल्या मनात वाटत होतं की मला काही महिन्यातच नोकरीवरून काढून टाकलं जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news