Jammu Kashmir Win Ranji Trophy 2026: इतिहास रचणारा जम्मू काश्मीरचा संघ होणार मालामाल... मुख्यमंत्री अब्दुल्लांकडून मोठी घोषणा

Jammu Kashmir Win Ranji Trophy 2026
Jammu Kashmir Win Ranji Trophy 2026pudhari photo
Published on
Updated on

Jammu Kashmir Win Ranji Trophy 2026: आज हुबळी इथं झालेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीरने बलाढ्य कर्नाटकचा पराभव करत इतिहास रचला. त्यांनी आपली पहिली वहिली रणजी ट्रॉफी जिंकली. आपल्या संघाचा हा ऐतिहासिक विजय जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मैदानावर उपस्थित राहून आपल्या डोळ्याने पाहिला.

Jammu Kashmir Win Ranji Trophy 2026
Jammu and Kashmir Ranji Trophy Win: जम्मू-काश्मीरची ऐतिहासिक कामगिरी! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर कोरलं नाव

या विजयानंतर ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले आणि खेळाडूंसाठी राज्य सरकारकडून रोख रक्कमेचं बक्षीस देखील जाहीर केलं. हे बक्षीस खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी जाहीर करण्यात आलं आहे. ओमर अब्दुल्ला यांनी संघासाठी २ कोटी रूपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे.

Jammu Kashmir Win Ranji Trophy 2026
Ranji Trophy Final | डोग्राच्या हेड-बटने गाजली रणजी फायनल

मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट केलं की, 'आणि ज्यावेळी आपल्या मुलांनी रणजी ट्रॉफी उंचावली, आपले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांना २ कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. याचबरोबर खेळाडू हे नुकतेच तयार करण्यात आलेल्या खेळाडूंसाठीच्या नियमानुसार सरकारी नोकरीसाठी देखील पात्र असणार आहेत.'

Jammu Kashmir Win Ranji Trophy 2026
Ranji Trophy 2026 |अशक्य ते शक्य करून दाखवलं! जम्मू-काश्मीरने रचला इतिहास; रणजी ट्रॉफीच्‍या फायनलमध्ये धडक

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यांदाच फायलनमध्ये पोहचलेल्या जम्मू काश्मीरने पाचही दिवस चांगली कामगिरी केली. कर्नाटकला पहिल्या डावात २९३ धावांवर बाद करत जम्मू काश्मीरने आपल्या पहिल्या डावात ५८४ धावा केल्या. पहिल्या डावात २९१ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात देखील जम्मू काश्मीरने ४ बाद ३४२ धावा केल्या. अखेर सामन्याचा निकाल पहिल्या डावाच्या आघाडीवर देण्यात आला. जम्मू काश्मीरनं इतिहास रचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news